रोम शहरातील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:51 PM2017-10-03T20:51:15+5:302017-10-03T20:55:45+5:30

प्राचीन कोलेजियम ही इटलीतील रोम शहरात वाळू आणि कॉंक्रीटपासून बांधलेली अॅम्फिथिएटर आहेत.

यास फ्लावियन अॅम्फिथिएटर असेही म्हणतात.

हे जगातील सर्वात जुने अॅम्फिथिएटर आहे. याचे बांधकाम व्हेस्पासियनच्या साम्राज्याच्या काळात इ.स.72 मध्ये सुरु झाले. इ.स.80मध्ये टायटसच्या काळामध्ये त्याचे काम पूर्ण झाले.

1953च्या रोमन हॉलिडे, 1954च्या डेमेत्रियस अॅंड द ग्लॅडिएटर्स या सिनेमांमध्ये हे अॅमम्फिथिएटर दाखवण्यात आले आहे.

1957 च्या 20 मिलियन माईल्स चित्रपटाचेही येथे छायाचित्रण झाले आहे.अशा प्रकारे हे अॅम्फिथिएटर अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येते.

आता पर्यटकांचे हे अत्यंत आवडते ठिकाण असून लाखो पर्यटक युरोप सहलीवर गेल्यावर या अॅम्फिथिएटरला भेट देतात.

टॅग्स :प्रवासTravel