farmer protest of delhi superhit on twitter, Rihanna's tweet the most retweets of the last year
आंदोलन सुपरहीट, रिहानाच्या 'त्या' ट्वीटला वर्षभरातील सर्वाधिक रिट्वीट By महेश गलांडे | Published: February 5, 2021 03:46 PM2021-02-05T15:46:33+5:302021-02-05T16:08:40+5:30Join usJoin usNext केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेता यांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता. हॉलिवूडची गायिक आणि पॉप स्टार सिंगर रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं होतं. रिहानाचं ते ट्विट शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ होतं. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे, यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून आलं. रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनीही ट्विट करुन, देशातील घटनांसंदर्भात, एकतेसंदर्भातील प्रश्न सोडवायला भारत सक्षम असल्याचं म्हटलं. तसेच, India together हा हॅश टॅगही चालविण्यात आला. सचिन तेंडुलकरपासून रोहित शर्मापर्यंत आणि अक्षय कुमारपासून अजय देवगणपर्यंत दिग्गजांनी रिहानाला ट्विटरवरुन सुनावले, त्यामुळे देशात रिहानाच्या ट्विटची आणखीनच चर्चा रंगली. रिहानाच्या गेल्या वर्षभरातील ट्विटचा अभ्यास केल्यास, रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले आहेत. म्हणजे, जानेवारी 2021 पासून ते आजतायागय म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंतचं तिचं ते सर्वात सुपरहीट ट्विट ठरलंय. शेतकरी आंदोलनासंदर्भात रिहानाने केलेल्या ट्विटला, 3 दिवसांतच 3 लाख 41 हजार 900 रिट्विट मिळाले आहेत. तर, 8 लाख 42 हजार लाईक्सचा पाऊस पडलाय. 1 लाख 55 हजार नेटीझन्सने त्यावर कमेंट केल्या आहेत. रिहानाने 1 जानेवारी 2020 पासून 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत म्हणजे गेल्या वर्षभरात केलेल्या ट्विटपैकी सर्वाधिक रिट्विट झालेलं ट्विट हेच ठरलंय, लाईक्सच्या बाबतीत या ट्विटला तिसऱ्या स्थानी जावं लागल आहे. जो बायडन आणि कमला हॅरीस यांच्या समर्थनार्थ केलेल्या रिहानाच्या ट्विटला, 2 लाख 82 हजार लाईक्स आहेत. लाईक्सचा विचार केल्या, रिहानाने अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर केलेल्या ट्विटला सर्वाधिक लाईक्स म्हणजे 11 लाख लाईक्स मिळाले आहेत, प्रत्येक मत मोजा, आम्ही वाट पहातोय, असं ट्विट रिहानाने बायडन यांच्या समर्थनार्थ केलं होतं. त्या ट्विटला 1 लाख 96 हजार रिट्विट मिळाले आहेत. रिहानाने 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटला 2 लाख 22 हजार रिट्विट मिळाले असून ते तिचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक रिट्विट झालेलं ट्विट ठरलं आहे. #Endasars असा हॅशटॅग तिने या ट्विटला दिला होता. रिहानाने जानेवारी 2020 च्या सुरुवातीला एक ट्विट केले होते, त्या तिच्या फोटोच्या ट्विटला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. 9 लाख 28 हजारांच्यावर लाईक्स या ट्विटला आहेत. मात्र, रिट्विट 1 लाख 15 हजार एवढेच आहेत. रिहानाच्या गेल्या वर्षभरातील ट्विटचा अभ्यास केल्यास, शेतकरी आंदोलनासंदर्भात तिने केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले असून लाईकच्या बाबतीत हे ट्विट चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, रिहानाचं ते ट्विट सुपरहीट ठरलंय. रिहानाने 30 मे रोजी केलेल्या या ट्विटला 3 लाख 69 हजार लाईक्स मिळाले आहेत फेब्रुवारी महिन्यातील रिहानच्या 2 ट्विटला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले होते, त्यामध्ये एका ट्विटला 3 लाख 83 हजार तर दुसऱ्या ट्विटला 3 लाख 19 हजार लाईक्स आहेत. पण, रिट्विट 50 हजारांच्या जवळपास आहेत. रिहानाच्या जानेवारी महिन्याील नवीन वर्षाच्या निमित्ताने टाकलेल्या फोटोला 9 लाख 28 हजार एवे लाईक्स आहेत, हे दुसऱ्या क्रमांकाचे लाईक्स मिळालेला फोटो आहे, याला 1 लाख 15 हजार रिट्विट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरील फॉलोवर्सच्या तुलनेत रिहाना एक पाऊल पुढेच आहे. नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 63.5 मिलियन्स म्हणजेच 6 कोटी 35 लाख फॉलोवर्स आहेत. तर, रिहानाचे तब्बल 1001 मिलियन्स म्हणजेच 11 कोटी फॉलोवर्स आहेत. ट्विटरवर रिहाना मोदींपेक्षा प्रसिद्ध किंवा लोकप्रिय असल्याचे दिसून येते. रिहाना 1029 जणांना फॉलो करत असून पंतप्रधान मोदी 2351 जणांना फॉलो करत आहेत. रिहाना बारबडीयन गायिका असून अभिनेत्री व उद्योजकही आहे. रिहाना ही 32 वर्षांची असून 21 व्या शतकातील जगातील टॉप गायिका आहे.टॅग्स :शेतकरी संपशेतकरी आंदोलनदिल्लीट्विटरसचिन तेंडुलकरFarmer strikeFarmers ProtestdelhiTwitterSachin Tendulkar