धक्कादायक! पोलिसाची केली हत्या; शरीराचे तुकडे शिजवले अन्...; बापलेकांनीच सांगितला घटनाक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:21 AM 2020-05-14T11:21:33+5:30 2020-05-14T11:42:37+5:30
संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरात आतापर्यत 44 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे.
मागील 24 तासात 88,202 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामझ्ये दिलासादायक बाबा म्हणजे जगभरात 16 लाख 57 हजार 716 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युक्रेनच्या खार्किव शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
डेली मेलच्या वृत्तानूसार, आरोपी मॅक्सिम कोस्तियुकोव आणि त्याचा मुलगा यारोस्लावलन यांनी पोलीस अधिकारी येवेजनी झेन्या पेत्रोव यांची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी तिघही एकाच ठिकाणी एकत्र बसून दारु पित होते. यानंतर काही कारणांवरुन तिघांमध्ये वाद झाला.हा वाद इतका टोकाला गेला की, मॅक्सिम कोस्तियुकोव आणि यारोस्लावल यांनी पोलिसावर चाकून वार केले. यामध्ये येवेजनी झेन्या पेत्रोव यांचा जागीच मृत्यू झाला.
येवेजनी झेन्या पेत्रोव यांची हत्या केल्यानंतर बापलेकांनी त्यांच्या शरीरातील काही अवयव शिजवून खाल्याची कबुली देखील दोघांनी दिली. तसेच स्वत:च खाल्ले नाहीत तर शेजारी राहणाऱ्या सर्वांना खायला घातलं. मात्र या लोकांना हे मांस कसलं आहे, याची माहिती नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमॉर्टेमध्ये येवेजनी झेन्या पेत्रोव यांच्या शरीरातील बहुतेक अवयव गायब होते. यारोस्वालनं आपण पेत्रोवचं मांस खाल्ल्यानं आजारी पडल्याची कबुलीही पोलिसांसमोर दिली.
पोलिसांनी हत्येप्रकरणी या दोघांना अटक केली असून 15 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच युक्रेनच्या संविधानाच माणसांची हत्या करून खाण्याबाबत शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे यांना फक्त हत्येची शिक्षा दिली जाऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.