Deepika Padukone : फुटबॉलशी संबंध नसताना थेट ट्रॉफीचे अनावरण; दीपिकालाच का मिळाला हा मान ? By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:43 AM 2022-12-19T11:43:15+5:30 2022-12-19T11:54:21+5:30
फिफा वर्ल्डकप २०२२ ची फायनल काल झाली. अर्जेटिनाने दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. पण दीपिकालाच हा मान का मिळाला याचं उत्तरही इंटरेस्टिंग आहे. फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.
दीपिकासोबत माजी स्पॅनिश फुटबॉलपटू इकर कॅसिलास देखील सामील झाले होते.
ट्रॉफीचे अनावरण करतानाचे दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हा खरं तर बॉलिवुडसाठी समस्त भारतीयांसाठीच अभिमानाचा क्षण होता असे म्हणावे लागेल.
दीपिका ही अशी बॉलिवुड अभिनेत्री आहे जी अनेक ग्लोबल ब्रॅंड्सची अँबेसिडर आहे.
फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची केस ग्लोबल ब्रॅंड लुई व्हिटॉनने डिझाईन केली आहे. दीपिका या ब्रॅंडची अॅंबेसिडर आहे. म्हणून दीपिकाला हा मान मिळाला.
दीपिका आणि इकर कॅसिलास यांनी ट्रॉफीवरचे कव्हर बाजुला केले आणि संपू्र्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी दीपिकाने गोल्डन जॅकेट आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घातला होता.
एकीकडे पठाण मधील गाण्यात भगवी बिकीनी घातली म्हणून दीपिकावर टीका होत असतानाच तिने फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करत भारताचे नाव उंचावले.