fire at historic notre dame cathedral in paris
फ्रान्समधील नोट्रे डेम कॅथेड्रेलला भीषण आग By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 02:49 PM2019-04-16T14:49:33+5:302019-04-16T14:53:43+5:30Join usJoin usNext पॅरिसमधील 800 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या नोट्रे डेम कॅथेड्रेलला काल संध्याकाळी भीषण आग लागली. युनेस्कोनं या कॅथेड्रेलला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. सोमवारी कॅथेड्रेलला लागलेली आग मंगळवारी नियंत्रणात आली. वास्तूकलेचा उत्तम नमुना असलेल्या कॅथेड्रेलला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 500 कर्मचारी अथक प्रयत्न करत होते. कॅथेड्रेलमधील असलेल्या अमूल्य वस्तू वाचवण्यातही यश आलं. कॅथेड्रेलची आग आटोक्यात आणल्यावर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अग्निशमन दलाचं कौतुक केलं. या आगीत झालेल्या नुकसानाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं. या आगीमुळे कॅथेड्रेलच्या गोथिक घुमटाचं आणि छताचं मोठं नुकसान झालं. नोट्रे डेम कॅथेड्रेलच्या उभारणीला 1163 साली सुरुवात झाली. 1345 मध्ये कॅथेड्रेलचं काम पूर्ण झालं. टॅग्स :फ्रान्सपॅरिसआगFranceParisfire