...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 07:45 PM 2018-05-25T19:45:34+5:30 2018-05-25T19:45:34+5:30
सॅलामँडर, चीन: अतिशय आक्रमक असणाऱ्या सॅलामँडरची संख्या खूप कमी होऊ लागलीय. मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असल्यानं हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
अमूर बिबट्या, रशिया: पूर्व रशियात आढळणारा अमूर बिबट्याही आता दुर्मिळ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या जिवंत असलेल्या अमूर बिबट्यांची संख्या फक्त 84 इतकी आहे. अमूर बिबट्याच्या कातडीसाठी त्याची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जात असल्यानं ही परिस्थिती निर्माण झालीय.
काळा गेंडा: सध्या जगात 5 हजार काळे गेंडे शिल्लक आहेत. गेंड्यांच्या शिंगांना काळ्या बाजारात मोठी किंमत मिळत असल्यानं त्यांची हत्या केली जाते.
ओरांगऊटान: सुमात्रा आणि बोर्नियोच्या जंगलात हा प्राणी पाहायला मिळतो. आग्नेय आशियात आता केवळ दीड हजार ओरांगउटांग शिल्लक राहिले आहेत. जंगलांची होत असलेली कत्तल आणि शिकारीचं वाढत प्रमाण यामुळे हा प्राणी संकटात सापडलाय.
क्रॉस रिव्हर गोरिला: कॅमेरुन आणि नायजेरियामध्ये हा प्राणी पाहायला मिळतो. सध्या या भागात फक्त 200 ते 300 क्रॉस रिव्हर गोरिला आहेत. माणसांकडून जंगलांवर होत असलेल्या अतिक्रमणामुळे हा प्राणी संकटात सापडलाय.