फ्लोरिडात पादचारी पूल कोसळला, सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 16:20 IST2018-03-16T16:20:32+5:302018-03-16T16:20:32+5:30

अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात शुक्रवारी एक पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.
फ्लोरिडातल्या मियामी येथे नवीनच बांधण्यात आलेला हा पादचारी पूल कोसळला आहे.
मिमामी विद्यापीठाजवळ असलेल्या हा पूल अचानक कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
अनेक प्रत्यक्षदर्शींनी पूल कोसळल्यानंतर स्फोटासारखा आवाज झाल्याचे सांगितले.
पूल कोसळल्यानं ढिगा-याखाली ब-याच गाड्या चिरडल्या गेल्या आहेत.