Flowers in the Desert Dubai's Fabulous 'Miracle Garden'
दुबईच्या वाळवंटात फुललं ‘मिरॅकल गार्डन’, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:21 PM2018-08-13T16:21:31+5:302018-08-13T16:33:38+5:30Join usJoin usNext दुबईच्या वाळवंटात एक असं गार्डन आहे ते पाहताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. वाळवंटात सुंदर फुलांनी फुललेलं, हिरवाईने नटलेलं गार्डन म्हणजे ‘मिरॅकल गार्डन’ मिरॅकल गार्डनमधील फुलांपासून बनविण्यात आलेल्या निरनिराळ्या रचना, सुंदर कलाकुसर आणि जोडीला नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण असलेल्या या गार्डनचं सौंदर्य पर्यटकांना भूरळ पाडतं. दुबईस्थित ‘आकार लँड स्केपिंग सर्विसेस अँड अॅग्रीकल्चर’ या कंपनीने ‘मिरॅकल गार्डन’ची ही अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या सुमारास ‘मिरॅकल गार्डन’ हे पर्यटकांसाठी उघडण्यात येतं. त्यानंतर हे गार्डन मे महिन्यापर्यंत चालू राहतं. ७२ हजार चौ. मीटर आकाराच्या गोलाकार जागेत ही बाग फुलवलेली असून जगातील हे सर्वात मोठं फुलाचं गार्डन आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली मनमोहक फुलं, सात कमानी, सात चांदण्या, पिसारा फुलवलेले मोर, लहान मोठी फुलांची घरे, पिरॅमिडच्या आकारात फुललेली विविध प्रजातीची फुले अत्यंत मोहक आहेत. सर्वात जास्त लांबीची फुलांची भिंत हे मिरॅकल गार्डनचे वैशिष्ट्य असून या गार्डनची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.टॅग्स :दुबईDubai