जगात सर्वांत शक्तिशाली देश कोणते, पहिल्या १० मध्ये कोणाचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:37 IST2025-02-04T11:26:00+5:302025-02-04T11:37:32+5:30

Forbes powerful country in the world: फोर्ब्स मासिकाने जगात शक्तिशाली असणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचे स्थान खूप खाली आहे.

फोर्ब्सने २०२५ मधील जगातील १० सर्वांत शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून, यामध्ये भारताला पहिल्या १० देशांच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

ही यादी अनेक महत्त्वाच्या बाबींवर आधारित आहे; पण प्रचंड लोकसंख्या, जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली लष्कर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतासारख्या देशाला वगळण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

फोर्ब्सने सांगितले की, ही यादी यूएस न्यूजने तयार केली असून, रँकिंगसाठी पाच मुख्य पॅरामीटर्सचा वापर करण्यात आला आहे.

भारत कोणत्या स्थानावर? : भारत जगातील १२ व्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली देश आहे. हा क्रमवारी आर्थिक स्थिती, मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि लष्करी सामर्थ्य यांसारख्या विविध घटकांवर आधारित आहे.

जागतिक जीडीपी क्रमवारीत भारत ५ व्या स्थानावर आहे, भारतापुढे अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे देश आहेत.