free higher education for the students ... in these countries
विद्यार्थांसाठी खूषखबर... या देशांमध्ये मिळते स्वस्तात उच्चशिक्षण By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 05:57 PM2018-03-16T17:57:30+5:302018-03-16T17:57:30+5:30Join usJoin usNext युरोपियन युनियनच्या नागरीकांना स्पेनच्या विद्यापीठामध्ये मोफत शिक्षण दिले जाते. युरोपियन युनियनमध्ये नसणाऱ्या देशांच्या नागरीकांनाही किमान शुल्क भरून शिक्षण घेता येऊ शकते. ग्रीसमध्ये परदेशातील विद्यार्थ्यांना फारच कमी पैशांमध्ये उच्चशिक्षण घेता येऊ शकते. ग्रीसमध्ये राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही जास्त नाही. बेल्जियममध्ये नामामात्र शुल्क भरून परदेशातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता येऊ शकते. हे शुल्क फारच कमी असते. फ्रान्समध्ये उच्चशिक्षण जवळपास निशुल्क आहे. पण काही विद्यापीठांमध्ये शुल्क आकारले जाते, पण हे शुल्क फारच कमी असते.