अमेरिकेतील ओहियोमध्ये दणक्यात साजरा झाला 'गणेशोत्सव' By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 05:41 PM 2018-09-26T17:41:44+5:30 2018-09-26T18:45:55+5:30
गणेशोत्सव भारतात मोठ्या उत्साहात साजरा झाला. साता समुद्रापारही बाप्पांची तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजानूसार पूजा केली जाते.
अमेरिकेतील नॉर्थ ईस्ट ओहियोच्या मराठी मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला.
ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी पारंपरिक पोशाख म्हणजेच नऊवारी साड्या नेसून तसेच पुरुषांनी भगवे फेटे परिधान करून बाप्पाचं स्वागत केलं.
ओहियोमध्ये गणेशोत्सावादरम्यान गणेश वंदन, किर्तन, ओव्या, पोवाडा, मंगळागौर यासारख्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
लहान-थोरांच्या उपस्थितीत ओहियोमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा करण्यात आली.
आपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात.