Ganeshotsav celebrated in Mauritius
मॉरिशसमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 10:55 AM2017-09-01T10:55:26+5:302017-09-01T11:11:39+5:30Join usJoin usNext 19 व्या शतकापासून मॉरिशसमध्ये मराठी बांधव स्थायिक झाले आहेत. दोन शतकांनंतरही त्यांनी गणपती प्रतिष्ठापनेची परंपरा कायम ठेवली आहे. कोकणातील परंपरेप्रमाणे येथेही डोक्यावरुन वाजत गाजत गणपती आणले जातात. (सर्व फोटो- शिरिष रामा, मॉरिशस) काही घरांमध्ये गणपती पाच, काही घरांमध्ये सात तर काही घरांमध्ये दहा दिवस गणपती बसविण्यात येतो. गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक मराठी वेशामध्ये जाखडी नृत्यही येथील तरुण-तरुणी करतात. मॉरिशसच्या विविध भागांमध्ये आज साधारणपणे सातशे गणपतींची प्रतिष्ठापना होते. गणेशमूर्तींचे विसर्जनही वाजतगाजत तलावांमध्ये केले जाते. (सर्व फोटो- शिरिष रामा, मॉरिशस)टॅग्स :गणेशोत्सवGaneshotsav