general li shangfu most controversial and banned by us is china new defense minister
China Military News: अमेरिकेनं ज्यावर बंदी घातली त्यालाच चीननं बनवलं संरक्षण मंत्री, नेमका प्लान काय? वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 02:57 PM2023-03-13T14:57:52+5:302023-03-13T15:03:32+5:30Join usJoin usNext चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे निकटवर्तीय जनरल ली शांगफू यांची देशाचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल शांगफू यांच्या नावाला रविवारी अधिकृत मान्यता मिळाली. जनरल शांगफू हे चीनचे सर्वात वादग्रस्त जनरल असून त्यांच्यावर अमेरिकेने बंदी घातली आहे. शांगफू यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती हा चीनकडून अमेरिकेसोबतचा तणाव वाढू शकेल असा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे. जनरल शांगफू हे अमेरिकेसाठी नेहमीच डोकेदुखी राहिले आहेत. कोण आहेत चीनचे नवे संरक्षण मंत्री? जनरल शांगफू यांनी चीनमधील अनेक मोठ्या एरोस्पेस प्रकल्पांची जबाबदारी घेतली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्समध्ये सामील होणारे ते पहिले सैनिक आहेत आणि आता ते देशाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचा भाग असतील. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे या लष्करी आयोगाचे प्रमुख आहेत. रविवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये जनरल शांगफू यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा अमेरिका आणि चीनमधील संबंध अधिक ताणले जाणार हे निश्चित झाले होते. ली शांगफू हे वेई फेंगे यांची जागा घेतील. ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या परिषदेत ली यांना चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगात समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.अमेरिकेनं बंदी का घातली? २०१८ साली S-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे अमेरिकेने बंदी घातलेला ते पहिले जनरल बनले. ली यांनी देशाच्या लष्करासाठी S-400 आणि सुखोई-35 साठी रशियन शस्त्रास्त्र कंपनी Rosborneexport सोबत करार केला होता. ज्यावेळी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली, त्याचवेळी ते चीनचे संरक्षण तंत्रज्ञान सांभाळात होते. त्यावेळी ते सर्वोच्च लष्करी आयोगात उपकरणे विकास विभागाचे संचालक होते. ली आणि त्यांच्या विभागाव्यतिरिक्त रशियाच्या काही संरक्षण युनिट्सवरही अमेरिकेने बंदी घातली होती.अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही बंदीनंतर जनरल शांगफू अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेअंतर्गत कोणतीही देवाणघेवाण करू शकत नाहीत. तसेच अमेरिकेच्या अखत्यारीतील परकीय चलनाच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेतील सर्व मालमत्ता ब्लॉक करण्यात आल्या असून त्यांना कधीही अमेरिकेचा व्हिसा मिळू शकत नाही. २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सची सुरुवात केली. त्याचा उद्देश अवकाश, सायबर, राजकीय आणि इलेक्ट्रॉनिक युद्धात प्रगती करणे हा होता. जनरल शांगफू यांनी या सर्व क्षेत्रात प्रभुत्व मिळवले आहे.चीनवर अमेरिकेची नजर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, त्यांच्या नियुक्तीमुळे असे मानले जाते की आता चीनचे उद्दिष्ट एरोस्पेस तंत्रज्ञान विकसित करणे हेच आहे. चीनच्या नॅशनल डिफेन्स टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे पदवीधर ली शांगफू यांनी चंद्रावरील पहिल्या मोहिमेचे निरीक्षण केले होते. २०१४ मध्ये, जेव्हा चीनने आपले मिशन सुरू केले तेव्हा ली शांगफू शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रात उपस्थित होते. यावेळी चीनने पहिले अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले गेले. शांगफू हे जिनपिंग यांच्या कुटुंबालाही जवळून ओळखत असल्याचं म्हटलं जातं. ली यांच्या नियुक्तीनंतर अमेरिका चीनवर बारीक नजर ठेवून आहे.टॅग्स :चीनअमेरिकाchinaUS