टाईम्स स्क्वेअरला 'त्या किस'मुळे मिळालेली प्रसिद्धी; जॉर्ज मेन्डोन्सा कालवश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:17 PM2019-02-19T14:17:01+5:302019-02-19T14:21:28+5:30

1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेसमोर जपानने शरणागती पत्करली होती. 14 ऑगस्टला युद्धसमाप्ती झाल्याच्या घोषणेच्या आनंदात व्यापाऱी खलाशी जॉर्ज मेन्डोन्सा यांनी परिचारिकेच्या वेशात असलेल्या सुंदर महिलेला किस केला होता. मेन्डोन्सा यांचे हे छायाचित्र त्याकाळी कमालीचे प्रसिद्ध झाले होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात संहार आणि हार-जीतपेक्षाही मोठ्या प्रमाणात हे छायाचित्र चर्चिले गेले होते. टाईम्स स्क्वेअरला युद्धसमाप्तीचा आनंदा साजरा करण्यासाठी आलेल्या मेन्डोन्सा आणि त्या नर्सचे अप्रतिम छायाचित्र छायाचित्रकार अल्फ्रेड एस्टिनडट यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले होते.

हा फोटो वी-जे डे (विक्ट्री ओव्हर जपान) या नावाने प्रसिद्ध आहे. खास बाब म्हणजे फोटोतील दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. ती त्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. फोटोग्राफर अल्फ्रेड यांनी त्यांच्या पुस्तकात लिहीले आहे की, जॉर्ज तेव्हा आनंदाने उड्या मारत येत होते. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक महिलेला ते आनंदाने मिठी मारून अभिनंदन करत होते. मात्र, या नर्सकडे आल्यावर त्यांची प्रतिक्रिया बदलली. त्यांनी घातलेल्या कपड्यांचा रंग आणि नर्सच्या कपड्यांचा रंग वेगवेगळा असल्याने हा फोटो घेतला आणि हा सुंदर क्षण टिपला गेला.

टाईम्स स्क्वेअरवरच्या या फोटोमुळे आजही अनेक जोडपी येथे त्या पोझमध्ये फोटो काढण्यासाठी येत असतात. येथे त्यांचे उत्स्फुर्त प्रेम व्यक्त करतात.

हा फोटो इतिहासाच्या पानांवर सुवर्ण क्षणांसाठी म्हणून नोंद आहे. आजही या फोटोचा अभ्यास अनेक विद्यापीठांमधून केला जातो.

अशा या जॉर्ज मेन्डोसा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. मिडलटाऊन येथे त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत 70 वर्षे संसार केला. जॉर्ज यांनी किस केलेल्या महिलेचे नाव ग्रेटा झिम्मर फ्राईडमॅन असे होते. ती दंतचिकित्सक होती.