थायलंडचे नववे राजा भूमिबल अतुल्यतेज यांच्या अंतिम संस्कारासाठी बनवला सोन्याचा रथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 22:24 IST2017-10-18T22:20:42+5:302017-10-18T22:24:40+5:30

थायलंडचे नववे राजा भूमिबल अतुल्यतेज यांचं वय वर्षं 88 असताना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झालं. त्यानंतर थायलंडमध्ये एक वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला.

थायलंडमध्ये देवासमान पूजला जाणारा राजा भूमिबल अतुल्यतेज यांच्या अंतिम संस्काराची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.

पाच दिवस चालणारा हा कार्यक्रम 26 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. जिथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्या जागेला बँकॉकच्या प्राचीन रूपाचा साज चढवण्यात आलाय.

गेल्या 10 महिन्यांपासून कलाकार काम करत आहेत. राजाच्या अंतिम संस्कारासाठी कलाकारांनी सोन्याचा रथ बनवला आहे.

रथाच्या माध्यमातून शाही कलश 26 ऑक्टोबरला अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ठेवला जाणार आहे.