पाकिस्तानातील सोन्याचा भाव बघुन तुम्हाला बसेल धक्का! म्हणाल... इतका फरक?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 07:23 PM2021-11-05T19:23:49+5:302021-11-05T19:56:12+5:30

दिवाळी म्हटलं की सोनेखरेदी आलीच. भारतात सोन्याचा सध्याचा भाव काय आहे याकडे सर्वच सामान्यांच लक्ष असतं पण आपल्या शेजारी देशात म्हणजेच पाकिस्तानात सोन्याचा भाव काय आहे हे जाणून घ्यायचं आहे का? मग पाहा photos

भारतातील सोन्याचा दर तुम्हाला माहिती आहे. भारतातील सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत राहतात. सध्या सोन्याचे दर आता विक्रमी पातळीच्या खाली आहेत.

पण, भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर खूप जास्त आहेत. तेथे एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात.

आपण पाहुयात सोन्याचे कॅरेटनुसार दर काय आहेत...

पाकिस्तानमध्येही सोन्याचे दर कॅरेटच्या आधारे निश्चित केले जातात, ज्यामध्ये २४ कॅरेट, २२ कॅरेट, २१ कॅरेट, १८ कॅरेटचा समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर तोळा, प्रति ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या आधारे निश्चित केले जातात. येथे १० ग्रॅम वजन नाही, कारण एक तोळ्याचा दर १० ग्रॅम सोन्यापेक्षा जास्त आहे. 3

त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याच्या एक ग्रॅमची किंमत ९९४५ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याच्या एक ग्रॅमची किंमत ९११६ रुपये आहे.

भारताचा एक रुपया म्हणजे पाकिस्तानी २.२९ रुपयांच्या बरोबरीचा आहे.

पाकिस्तानवर कर्जाचा बोझा वाढतच आहे. त्याचा परिणामही सोन्याच्या किंमतींवर होताना दिसतो आहे.

२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापारसंबंधी तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या बाजारात याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळाला होता.

उपासमार, महागाई आणि गरिबीने पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. पाकिस्तानमध्ये भाज्या, पेट्रोल-डिझेलनंतर आता सोन्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे.