रस्त्यावर अवतरला 260 वर्ष जुना राणीचा सोन्याचा रथ, जाणून घ्या गोल्ड स्टेट कोचची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 01:44 PM2022-06-04T13:44:33+5:302022-06-04T14:00:42+5:30

Gold state coach : 260 वर्ष जुना हा सोन्याचा रथ आहे ज्यातून महाराणी 1953 मध्ये आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी पहिल्यांदा बकिंघम पॅलेसमधून वेस्टमिंस्टर एबेपर्यंत गेली होती.

Britain Platinum Jubilee pageant Of Queen Elizabeth II: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या शासन काळाला 70 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या खास क्षणानिमित्त एक सोन्याचा रथ ब्रिटनच्या रस्त्यांवर फिरताना बघून लोक हैराण झाले. 260 वर्ष जुना हा सोन्याचा रथ आहे ज्यातून महाराणी 1953 मध्ये आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी पहिल्यांदा बकिंघम पॅलेसमधून वेस्टमिंस्टर एबेपर्यंत गेली होती. Gold State Coach नावाचा हा रथ रविवारी लंडनमध्ये प्लॅटिनम जुबली परेडमध्ये दिसणार आहे.

इंग्लंडच्या राजगादीवर महाराणी एलिझाबेथ द्वितीयला 70 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्यांच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराणी प्लेटिनम जुबली समारोहाच्या सुरू असलेल्या चार दिवसीय कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी थॅंक्सगिविंग सेवा झाली.

यावेळी महाराणीचा खास सोन्याचा रथ वीस वर्षांनी रस्त्यावर अवतरला. याच्या खासियतबाबत सांगायचं तर चार टन वजनी रथ 4 मीटर लांब आणि 3.6 मीटर उंच आहे. हा रथ घोड्यांचा मदतीने घेचला जातो. या रथावर सोन्याचे कमीत कमी सात थर चढवले आहेत. हा रथ किंग जॉर्जचे वास्तु सल्लागार विलियम चेंबर्स यांनी डिझाइन केला होता. आणि सॅम्युअल बटलर यांनी याची निर्मिती केली होती.

शनिवारी प्लेटिनम जुबली कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे. तेच यूकेमधील सर्वात मोठ्या चर्चची घंटी, 16 टन ग्रेट पॉल, क्रार्यक्रमानंतर चार तास वाजत राहणार आहे. प्रिन्स ऑफ वेल्स, डचेस ऑफ कॉर्नवाल आणि ड्यूक अॅन्ड डडेस ऑफ कॅम्ब्रिजसहीत रॉयल फॅमिलीतील सगळे लोक यात सहभागी होतील. तसेच प्रिन्स चार्ल्स अधिकृतपणे राणीचं प्रतिनिधित्व करतील. 2 वर्षाआधी ब्रिटन सोडल्यानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगनचा सोबत हा एकत्र पहिला कार्यक्रम आहे.

महाराणी एलिझाबेथ यांनी हा सोहळा यादगार बनवण्यासाठी मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. तेच सोन्याच्या ज्या रथाची चर्चा सुरू आहे तो लाकडापासून तयार केला असून त्यावर सोन्याचे थर चढवण्यात आले आहेत.

महाराणीचा 70 वर्षांचा कार्यकाळ सेलिब्रेट करण्यासाठी 4 दिवसीय जयंती समारोह गुरूवारपासून सुरू झाला. जिथे हा सोन्याचा रथ या प्लेटिनम जुबली समारोह परेडमध्ये समोर असेल.

हा सोन्याचा रथ परीच्या कथेसारखा आहे. शाही रथ ऐतिहासिक कलाकारीचा जिवंत नमुना आहे. Gold State Coach जेवढा बाहेरून सुंदर आहे तेवढंच सुंदर त्याचं एंटेरिअर आहे. रविवारी होणाऱ्या समारोहात महाराणी यात बसणार नाही. एलिझाबेथ द्वितीय आता 96 वर्षांच्या आहेत आणि सार्वजनिक कार्यक्रमात कमीच दिसतात. एलिझाबेथ जेव्हा 25 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या राणी झाल्या होत्या. त्या ही गादी सर्वात जास्त काळ सांभाळणाऱ्या व्यक्ती आहेत. त्या 7 दशकांपेक्षा अधिक काळापासून या पदावर आहेत.