खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 09:31 AM2024-09-30T09:31:46+5:302024-09-30T10:08:22+5:30

Sunita Williams : सुनीता विल्यम्स गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक अडचणीमुळे अंतराळात अडकली आहे. आता त्यांना परत आणण्यासाठी नासाची टीम पोहोचली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अंतराळात सुनीता विल्यम्स आणि बिच विल्मोर काही तांत्रिक अडचणीमुळे अडकल्या आहेत. बोईंग स्टारलाइनरद्वारे त्या जून महिन्यात अंतराळ स्थानकात पोहोचल्या आहेत. पण बोईंग स्टारलाइनरमध्ये अचानक काही तांत्रिक अडचणी आल्या, यामुळे त्या अंतराळात अडकल्या आहेत.

सुनीता विल्यम्स यांना परत आणणारे नासाचे यान अवकाशात पोहोचले आहे. नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह, नासा आणि स्पेसएक्सच्या क्रू-9 मोहिमेच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये प्रवास करत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या पोहोचले आहेत.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जून २०२४ मध्ये अंतराळात गेले आहेत. पण, त्यांच्या बोईंग स्टारलाईनरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे ते अडकले. दरम्यान, आता पृथ्वीवरुन स्पेसएक्स कॅप्सूल येताच नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांचे स्वागत केले.

स्पेसएक्सने शनिवारी ही मोहीम सुरू केली, ही टीम आज स्पेस स्टेशनवर पोहोचली. स्पेस मिशन स्पेसएक्स क्रू 9 पुढील वर्षी पृथ्वीवर परत येईल. हेग आणि गोर्बुनोव्ह यांनी संध्याकाळी 7:04 वाजता अंतराळ स्थानकात प्रवेश केला, असे नासाने एका निवेदनात म्हटले आहे.

हेग आणि गोर्बुनोव्ह यांचे स्पेस स्टेशनच्या एक्सपिडिशन 72 क्रूने स्वागत केले. त्यात नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, मायकेल बॅरेट, जीनेट एप्स, डॉन पेटिट, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स, तसेच रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर ग्रेबेनकिन, ॲलेक्सी ओव्हचिनिन आणि इव्हान वॅगनर यांचा समावेश होता.

याबाबत नासाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन माहिती दिली. पोस्टमध्ये म्हटले की, 'तुमचे अधिकृतपणे स्वागत आहे.' एक्सपिडिशन 72 क्रू ने क्रू 9 चे स्वागत केले.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला क्रू-8 सदस्य डॉमिनिक, बॅरेट, एप्स आणि ग्रेबेंकिन पृथ्वीवर परत येईपर्यंत स्पेस स्टेशनवरील क्रू संख्या 11 लोकांपर्यंत वाढेल. शनिवारी, SpaceX ने स्टारलाइनर अंतराळवीरांना परत करण्यासाठी ISS वर दोन-क्रू-9 मिशन लाँच केले.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला क्रू-8 सदस्य डॉमिनिक, बॅरेट, एप्स आणि ग्रेबेंकिन पृथ्वीवर परत येईपर्यंत स्पेस स्टेशनवरील क्रू संख्या 11 लोकांपर्यंत वाढेल. शनिवारी, SpaceX ने स्टारलाइनर अंतराळवीरांना परत करण्यासाठी ISS वर दोन-क्रू-9 मिशन लाँच केले.

बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स औपचारिकपणे मिशन 71/72 क्रूचा भाग म्हणून फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचे कार्य सुरू ठेवतील. एजन्सीच्या SpaceX क्रू-9 मिशनला नियुक्त केलेल्या इतर दोन क्रू सदस्यांसह ते SpaceX ड्रॅगन अंतराळयानावर परत येतील.

टॅग्स :नासाNASA