Gorilla war marshal Taiwan's Sea Dragon force will be the most dangerous for China
आता होणार गोरिला वॉर! चीनसाठी सर्वात घातक ठरणार तैवानची Sea Dragon फोर्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 04:45 PM2022-08-04T16:45:47+5:302022-08-04T16:49:43+5:30Join usJoin usNext रशियानं केलेली चूक चीन करणार नाही. कारण तैवानची स्पेशल फोर्सेस त्यांच्या जमिनीवर खूपच घातक आहेत. या फोर्सेसला कुठे, कधी आणि कसा हल्ला करायचा हे माहिती असतं. तैवानकडं अशी सैन्यदल तुकडी आहे जी एलीट कमांडो कॅटेगिरीसारखी घातक आहे. परंतु त्यात सर्वात खतरनात सी ड्रॅगन फ्रॉगमॅन(Sea Dragon Frogmen) यांना केवळ फ्रॉगमेन म्हणून ओळखलं जातं. या फोर्सची स्थापना १९४९ मध्ये अमेरिकेच्या मदतीनं केली होती. इतकेच नाही तर या जवानांची ट्रेनिंग अमेरिकेच्या नेवी सील्स कमांडोसोबत होते. या टीमचं खरे नाव १०१ एंफिबियस रिकॉनसेंस बटालियन असं आहे. या यूनिटला सर्वसामान्यपणे अंडरवॉटर ऑपरेंशन्ससाठी बनवण्यात आले होते. परंतु अर्बन वॉरफेयर, जंगल वॉरफेयर आणि गनिमी कावा युद्धातही ते सक्षम आहेत. यांचा हल्ला इतका घातक आणि वेगवान असतो ज्याने शत्रूला भनकही लागत नाही हल्ला करणारे कुठे गेले? सी ड्रॅगन फ्रॉगमेनचे (Sea Dragon Frogmen) सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुप्तपणे प्राणघातक हल्ला करणे. एकदा का ते एखाद्या मिशनवर निघाले की ते पूर्ण केल्यानंतरच शांत बसतात. असं मानलं जाते की, चीनसोबत जर युद्ध झाले तर ही विशेष टीम चिनी सैनिकांच्या तुकडीला उद्ध्वस्त करेल. त्यात केवळ सैनिकच नव्हे तर चीनची आर्टिलरी, तोफ, चिलखती वाहनेही उडवून दिली जातील. सी ड्रॅगन फ्रॉगमेनचे खरे उद्दिष्टे ते पाळत ठेवणे, हेरगिरी, घुसखोरी, किनारी सुरक्षा आणि गुप्त ऑपरेशन्स आहेत. या संघात निवड झालेल्या तरुणांची निवड करण्याची प्रक्रिया अत्यंत अवघड असते. निवड झाल्यानंतर, त्यांना १५ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. ज्याला दर आयरन मॅन रोड बोललं जाते. यानंतर पाच दिवसांचा पात्रता अभ्यासक्रम असतो. या १५ आठवड्याच्या ट्रेनिंगनंतर केवळ २० टक्के सी ड्रॅगन फ्रॉगमेन बनू शकतात. जेव्हा यांना कमांडो घोषित केले जाते. तेव्हा त्यांच्या उघड्या छातीवर यूनिट बॅचचा शिक्का छापला जातो. त्यानंतरच ते सी ड्रॅगन फ्रॉगमेन ओळखले जातात. त्यांच्याकडे अत्याधुनिक अमेरिकी हत्यारे असतात. ज्याचा वापर कुठल्याही कोवर्ट ऑपरेशन अथवा जवळच्या लढाईत केला जाऊ शकतो. याची संख्या किती आहे त्याचा खुलासा सार्वजनिक स्तरावर कुठेच नाही. सी ड्रॅगन फ्रॉगमेनसारखेच तैवानमध्ये आणखी एक एलीट कमांडो फोर्स आहे. ज्याचं नाव एअरबॉर्न स्पेशल सर्व्हिस कंपनी आहे. त्यांना लियांग शान स्पेशल ऑपरेशन्स कंपनी म्हणून ओळखलं जाते. हीदेखील तैवानच्या सर्वात घातक कमांडोपैकी एक आहे. ही तुकडी डीकेपिटेशन स्ट्राईक म्हणजे शत्रू देशातील सर्वात मोठ्या लीडरचा खात्मा करण्याचं काम करू शकते. एअरबोर्न स्पेशल सर्व्हिस कंपनी (ASSC) मध्ये सुमारे १५० कमांडो आहेत. या संघाची स्थापना १९८० साली झाली. ते अमेरिकेचे डेल्टा फोर्स आणि ब्रिटिश आर्मीच्या स्पेशल एअर सर्व्हिस फोर्ससारखे आहेत. त्यांचे प्रशिक्षणही खूप धोकादायक आहे. प्रत्येकजण या संघाचा भाग असू शकत नाही. एकदा ASCC ज्वाइन केल्यानंतर त्याला संपूर्ण करिअरमध्ये त्याचा चेहरा लपवून ठेवावा लागतो. तैवानमध्ये आणखी एक विशेष बल आहे, जे गोरिला युद्धात तरबेज आहेत. रिपब्लिक ऑफ चायना मिलिटरी पोलिस स्पेशल सर्व्हिसेस कंपनी असं त्याचं नाव आहे. लोकांना या युनिटबद्दल फारशी माहिती नाही. कारण ते थेट तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाला रिपोर्ट करतात. तसे, ते १९७८ मध्ये तयार झाले. ही टीम अनेकदा अमेरिकन सैन्यासोबत कसरत करते. याशिवाय त्यांचे प्रशिक्षणही बाहेरचे आहे. MPSSC चं मुख्य काम दहशतविरोधी मोहिमेला बळ देणे आहे. त्याची ट्रेनिंग ५ महिन्याची असते. हे सी ड्रॅगन फ्रॉगमेनसोबत ट्रेनिंग करतात. हे नॉन प्रोजेक्टाइल एंटी ड्रोन वेपन्सचा उपयोग करतात. त्याशिवाय अत्याधुनिक हत्यारेही त्यांच्याकडे असतात. त्याचप्रमाणे आणखी एक कमांडो फोर्स आहे. ज्याचं नाव थंडर स्क्वॉड(Thunder Sqaud) ही तैवानची नॅशनल पोलीस एजन्सी स्पेशल यूनिट आहे. ज्यात २०० कमांडो आहेत. थंडर स्क्वॉड तैवानची उत्तम SWAT टीम आहे. ती शहरी युद्धात माहीर आहे. त्याचे मुख्य काम दहशतवादा विरोधात मिशन, स्पेशन वेपन ऑपरेशन, प्रोटेक्शन आणि हल्ला करणे आहे. तैवानच्या प्रमुख लोकांचा जीव वाचवणे हे या पथकाचं काम आहे. भारतातील एसपीजी टीमसारखं त्यांचे काम आहे. टॅग्स :चीनchina