अ‍ॅस्ट्राझिनेकाला मोठे यश! लस तर बनवलीच, पण कोरोनावर औषधही शोधले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 08:16 PM2020-12-26T20:16:43+5:302020-12-26T20:22:18+5:30

Corona Vaccine, medicine News: अ‍ॅस्ट्राझिनेका ही तीच कंपनी आहे जिने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून कोरोनावर लस बनविली आहे. या लसीचे उत्पादन पुण्याची सीरम इन्सि्टट्यूट करत आहे.

कोरोना लसीच्या चाचण्यांमध्ये यश आल्यानंतर ब्रिटनची औषध निर्माता कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेकाने नवीन औषधही शोधले आहेत. हे औषध कोरोना संक्रमित लोकांना गंभीर होण्यापासून वाचविणार आहे.

ही एक विशिष्ट अँटीबॉडी आहे, जी कोरोना लस ज्यांना मिळू शकली नाही किंवा काही कारणांनी ते टोचून घेऊन शकत नाहीत अशा लोकांसाठी वरदान ठरणार आहे.

नवीन अँटीबॉडीची चाचणी सुरु झाली आहे. ही या प्रकारची पहिली चाचणी आहे. बीबीसीने याचे वृत्त दिले आहे.

सुरुवातीला 10 लोकांना ही अँटीबॉडी देण्यात आली आहे. हे 10 लोक असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने कोरोना संक्रमित व्य़क्तीच्या संपर्कात आले होते. हे औषध कोरोनापासून इमरजन्सी संरक्षण असल्याचे सांगितले जात आहे.

अ‍ॅस्ट्राझिनेका ही तीच कंपनी आहे जिने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून कोरोनावर लस बनविली आहे. या लसीचे उत्पादन पुण्याची सीरम इन्सि्टट्यूट करत आहे.

अ‍ॅस्ट्राझिनेकाचे हे नवीन औषध ब्रिटन सरकारचे विद्यापीठ कॉलेज ऑफ लंडन हॉस्पिटल (UCLH) वापरू लागले आहे.

या चाचणीवेळी दोन प्रकारच्या अँटीबॉडी वापरल्याने कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळू शकते का, यावर संशोधन केले जाणार आहे.

लस टोचल्यानंतर शरीरात पूर्णपणे इम्यूनिटी विकसित होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. यामुळे एखादा व्यक्ती संक्रमित झालेला असेल तर त्याला तातडीने सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. लसीमुळे हे शक्य नाही. यामुळे औषध यासाठी खूप मोलाचे आहे.

अ‍ॅस्ट्राझिनेकाचे हे नवीन औषध कोरोना व्हायरसला लगेचच न्यूट्रलाईज करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे औषध घेतलेला व्यक्ती १ वर्ष कोरोनापासून सुरक्षित राहू शकणार आहे.

UCLH चे व्हायरोलॉजिस्ट केथरीन हूलिहान यांनी सांगितले की, चाचणीमध्ये 1000 लोकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी ते नुकतेच कोरोना पॉझिटीव्हच्य संपर्कात आलेले त्यांचे मित्र, नातेवाईक असायला हवेत.