guardian of animals naoto matsumura lives alone in a radioactive town tomioka in japan vrd
नऊ वर्षांपासून ओसाड भागात एकट्यानं राहते ही व्यक्ती; पशु-पक्ष्यांनाच बनवलं मित्र By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 09:36 PM2020-03-30T21:36:53+5:302020-03-30T21:53:37+5:30Join usJoin usNext मानव आणि पशु-पक्ष्यांमध्ये जिव्हाळ्याचं नातं बऱ्याचदा पाहायला मिळतं. प्राणीसुद्धा आपल्या मालकाशी प्रामाणिक असतात. जपानमधल्या अशाच एका मनुष्याला जनावरांची प्रचंड आवड आहे. विशेष म्हणजे तो जनावरांसोबत एका ओसाड ठिकाणी एकट्यानं वास्तव्य करतो. जपानमध्ये आलेल्या सुनामीमुळे आण्विक अपघात झाला आणि त्यातील काही किरणोत्सर्ग या भागात पडली. त्यामुळे इथली एक वसाहतचं नष्ट झाली. त्या ठिकाणीच ही व्यक्ती जनावरांच्या सान्निध्यात वास्तव्य करत आहे. त्या ठिकाणी एखादी व्यक्ती एकट्यानं राहू शकत नाही. पण मत्सुमुरा हे तिकडे एकट्यानं वास्तव्य करतात. हे क्षेत्र गेल्या नऊ वर्षांपासून ओसाड आहे. तरीही ही व्यक्ती तिथे कोणतीही भीती न बाळगता आपले आयुष्य आरामात जगत आहेत. नाओटो मत्सुमुरा जपानमधील टोमिओको या छोट्या गावात राहतो. खरंतर 11 मार्च 2011ला फुकुशिमा, जपानमध्ये एक भयंकर आण्विक अपघात झाला. त्यानंतर टोमियोकोसह आसपासच्या भागात राहणारे लोक आपली घरे सोडून इतर भागात स्थायिक झाले. नाओटो मत्सुमुरा यांनीही टोमिओको भाग सोडला होता परंतु त्यांना राहण्यासाठी जागा न मिळाल्यास ते परत टोमियोको येथे आले. मत्सुमुरा हा फुकुशिमाच्या प्राण्यांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते. सुरुवातीला त्यांनी केवळ आपल्या पाळीव प्राण्यांचे पालनपोषण केले, परंतु नंतर ते सोडून गेलेल्या प्राण्यांचे पालक बनले. मत्सुमुराला 'रेडिओएक्टिव्ह मॅन' असेही म्हणतात. कारण एका संशोधनानुसार, एका सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात आलेल्या रेडिएशनपेक्षा 17 पटीनं अधिक प्रमाणात मत्सुमुराचा फटका बसला आहे. यामागचे कारण असे आहे की, जेव्हा तो टोमिओकोला परतला, तेव्हा तो येथे उपस्थित भाज्या, मांस किंवा मासे खायचा, ज्यामध्ये बरेच विकिरण होते. तथापि, आता ते बाहेरचे अन्न खातात. या दोन्ही गोष्टींमध्ये कोणतेही विकिरण नाही. मत्सुमुरा ज्या भागात राहतात तेथे वीज किंवा पाणी नाही. त्यांच्याकडे सौर पॅनेल आहे, ज्याच्या मदतीने ते आपला मोबाइल चार्ज करतात. त्याच्यावरच ते संगणकही चालवतात. त्यांना सिगारेटचे व्यसन आहे. माणसांऐवजी पशु-पक्ष्यांच्या सान्निध्यात त्यांना राहायला प्रचंड आवडते. त्यांनी गायी, शहामृग, मांजरं अशी विविध पशु-पक्षी पाळले आहेत.