Henry Every: शिवरायांच्या काळातील मोस्ट वॉन्टेड समुद्री लुटारू; औरंगजेबाचा अब्जोंचा खजिना लुटलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:54 PM2021-04-06T16:54:30+5:302021-04-06T17:06:26+5:30

Captain Henry Every looted Mughal king Aurangzeb's ganj e sawai in Arabian Sea: 17 व्या शतकात मुघलांना दोन जबर धक्के बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात भारतभूमीवर मराठ्यांचा झंझावात आणि दुसरा मोठा धक्का म्हणजे भर समुद्रात अब्जावधींची सोन्याची आणि चांदीची नाणी असलेल्या गलबतांची लूट. शिवरायांचा इतिहास साऱ्या जगाला ठाऊक आहे. परंतू ही दुसरी घटना पुन्हा चर्चेत आली आहे.

मुघलांच्या साम्राज्याला एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून हादरा दिला होता. दुसरीकडे शिवरायांनंतर एका जगातील मोस्ट वॉन्टेड असलेल्या समुद्री लुटारूने औरंगजेबाचा अब्जोंचा खजिना लुटला होता. (World Famous pirates Henry Every death story revele soon, who looted Mughal king Aurangzeb's ganj e sawai )

17 व्या शतकात मुघलांना दोन जबर धक्के बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात भारतभूमीवर मराठ्यांचा झंझावात आणि दुसरा मोठा धक्का म्हणजे भर समुद्रात अब्जावधींची सोन्याची आणि चांदीची नाणी असलेल्या गलबतांची लूट. शिवरायांचा इतिहास साऱ्या जगाला ठाऊक आहे. परंतू ही दुसरी घटना पुन्हा चर्चेत आली आहे.

तेव्हाच्या काळातील जगभरात दहशत असलेला कुख्यात, मोस्ट वॉन्टेड समुद्री लुटारू कॅप्टन हेन्री इव्हरी याची ही गोष्ट आहे. त्याच्या मृत्यूची कहाणी साऱ्या जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुघल बादशाह औरंगजेबाचे जहाज गंज ए सवाई लुटले गेले होते. यामध्ये हज यात्रेकरूदेखील होते. ते मक्केहून भारतात परतत होते. अमेरिकेच्या न्यू इंग्लंडमधील रोडे बेटांवर 17 व्य़ा शतकातील सोन्या आणि चांदीची नाणी सापडली आहेत. ही नाणी कॅप्टन हेन्री इव्हरीच्या खात्म्याचा खुलासा करू शकतात.

सात सप्टेंबर 1695 ची ही घटना आहे. डाकू कॅप्टन हेनरीचे जहाज फँसीने अरबी समुद्रात औरंगजेबाचे जहाज गंज-ए-सवाईवर हल्ला केला. हे औरंगजेबाचे शाही जहाज होते. यामध्ये यात्रेकरुंसह अब्जावधींचा खजिना होता.

ओरंगजेब तेव्हा जगातील सर्वाच शक्तीशाली लोकांच्या पंगतीत बसत होता. हेच जहाज लुटल्याने हेनरीला जगातील मोस्ट वॉन्टेड समुद्री लुटारु म्हणून घोषित करण्यात आले होते.

हज यात्रेकरुंची हेनरीने क्रूरतेने हत्या केली होती. यानंतर हेनरीने वाचण्यासाठी बहामासकडे पळ काढला होता. बहामासला समुद्री डाकुंचा स्वर्ग म्हणून ओळखले जायचे.

इतिहासकालीन पुराव्यांनुसार जेव्हा या लुटीची खबर औरंगजेबाला लागली तेव्हा त्याचा तिळपापड झाला होता. त्याने ब्रिटनचे तत्कालीन राजे विल्यम्स तृतीय यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली. यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन हेनरीच्या डोक्यावर मोठे बक्षीस जाहीर केले होते. तरीही हेनरी काही कोणाच्या हाती लागला नाही.

इतिहासकारांनुसार हेनरी 1696 मध्ये आयर्लंडमध्ये निघून गेला होता. यानंतर त्याचाबाबत काहीच माहिती हाती लागली नव्हती. या नाण्यांनी पुन्हा इतिहासरांच्या चेहऱ्य़ावर चमक आणली आहे.

कारण ही नाणी हे दर्शवितात की कॅप्टन हेनरी हा औरंगजेबाचे जहाज लुटून अमेरिकेकडे निघून गेला होता. येथेच रोजचा खर्च भागविण्यासाठी लुटमार करत होता.

पहिल्यांदा हे पूर्ण नाणे 2014 मध्ये मिडलटाऊनच्य़ा एका शेतात सापडले होते. यानंतर या परिसराची मेटल डिटेक्टरने चाळण करण्यात आली. खोदकामात आणखी एक चांदीचा शिक्का मिळाला. सुरुवातीला त्यावरील लिखाणावरून तो स्पॅनिश असेल असे मानले गेले. मात्र, संशोधनात तो अरबी भाषेतील मजकूर असल्याचे समोर आले.

हे नाणे 1693 मध्ये येमेनमध्ये बनविण्यात आले होते. संशोधकांना, इतिहासकारांना मोठा धक्का बसला. कारण त्या काळात अमेरिका आणि आखाती देशांमध्ये कोणताच व्यापार होत नव्हता. आतापर्यंत 15 अशी नाणी सापडली आहेत.