ट्रम्प की बायडन?; 1984 पासून अचूक भाकित वर्तवणाऱ्याने सांगितलं कोण जिंकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 02:54 PM2020-08-06T14:54:46+5:302020-08-06T15:17:55+5:30

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या भविष्यवाणी मॉडेल्सचे आजोबा म्हणून ओळखल्या जाणार्‍या इतिहासकाराने म्हटले आहे की, २०२०च्या राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन जिंकतील.

अमेरिकन युनिव्हर्सिटीचे इतिहासकार अॅलन लिचमन यांच्या अंदाजाकडे लक्ष देणे योग्य आहे, कारण त्यांनी १९८४ पासूनच्या प्रत्येक निवडणुकांचा अचूक अंदाज वर्तविला आहे.

ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली होती. यासंदर्भातही त्यांनी अंदाज वर्तविला होता.

बुधवारी प्रकाशित झालेल्या न्यूयॉर्क टाइम्समधील एका ऑप-एड व्हिडिओमध्ये अॅलन लिचमन मॉडेलने नेहमीप्रमाणे व्हाईट हाऊस संदर्भात 13 निकष सांगितले आहेत. ज्यामुळे आता बायडन 3 नोव्हेंबरला विजय मिळविण्याच्या आघाडीवर आहेत, असा अंदाज आहे.

यावेळी, अॅलन लिचमन यांच्या आधीच्या अंदाजानुसार, राष्ट्रीय सर्वेक्षणांवरून असे दिसून येते की, बायडन पर्यायी नेतृत्व करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

रिअल क्लीयर पॉलिटिक्सद्वारे केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षण सरासरीनुसार, बायडन यांना 49.4 टक्के मतदान, तर ट्रम्प यांना 42.4 टक्के मतदान आहे. बायडन यांचे ट्रम्प यांच्यापेक्षा सात टक्के जास्त आहे.

लिचमन म्हणाले की, व्हाईट हाऊसमधील शर्यतीतील विजयाचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या 13 खऱ्या-खोटा निकषांचा विचार केला आहे. त्यापैकी बायडन यांची सात निकषांत ट्रम्प यांच्यावर आघाडी आहे. या निकषांमध्ये अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, घोटाळे, सामाजिक अशांतता यासारख्या घटकांचा समावेश आहे.

हे निश्चितपणे समजले पाहिजे की, मॉडेल वैज्ञानिक नाही, परंतु लिचमॅन यांचा अंदाज कसा ठरतो. हे पाहणे योग्य ठरणार आहे.

अलीकडेच, ट्रम्प ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आर्थिक आणि बाजाराच्या प्रगती विषयी बोलत आहेत, कारण नोव्हेंबरमधील विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात Nasdaq Composite Index COMP, +0.52% चा उच्च रेकॉर्ड केला आहे, तो बायडन निवडणूक जिंकल्यानंतर कोसळले, असा दावा सोमवारी ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, शेअर बाजाराचे यश ट्रम्प यांच्या विजयासाठी पुरेसे नाही, असेही बोलले जात आहे.