At home, you will have to accept a condition of 80 rupees
80 रुपयांत मिळेल घर, मान्य करावी लागेल एक अट By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 02:09 PM2019-02-20T14:09:06+5:302019-02-20T14:12:50+5:30Join usJoin usNext चांगलं मोठं घर विकत घेणं आताच्या परिस्थितीच्या आवाक्याबाहेर आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात, परंतु 80 रुपयांतही आपल्याला घर मिळू शकते. इटलीच्या संबुका इथं हे घर फक्त 80 रुपयांत विकलं गेलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. सीएनएनमधील अहवालानुसार इटलीमधल्या संबुका शहर मेडिटेरेनियन समुद्राच्या काठी पर्वतराजीत वसलेलं आहे. या शहरातील अनेक लोक स्थलांतरित झाल्यानं ते सूमसाम होऊ नये, यासाठी नागरी प्राधिकरणानं एक अनोखी शक्कल लढवली. परंतु इथे घर घेण्याच्या काही अटी आहेत, तर तुम्हाला हे घर घ्यायचं असल्यास त्या अटी मान्य कराव्या लागतील. जो कोण हे घर घेणार आहे, त्याला 4 लाख रुपये (5000 युरो) सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जमा करून ठेवावे लागतील. तसेच त्या घराचं तीन वर्षांनी पुनर्निमाण करावं लागेल. घराच्या सुशोभीकरणासाठी 17,000 डॉलर (सुमारे 12 लाख रुपये) खर्च अपेक्षित असून, एवढा खर्च केल्यानंतर जेणेकरून घर सुंदर दिसेल.