"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:02 AM 2024-05-09T01:02:13+5:30 2024-05-09T01:19:19+5:30
Porn Star Stormy Daniels shocking revelations about Donald Trump: अडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने कोर्टाच्या साक्षीत सांगून टाकली डोनाल्ड ट्रम्प यांची 'डर्टी सिक्रेट्स' Porn Star Stormy Daniels shocking revelations about Donald Trump: अमेरिकन पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने कोर्टात हजर राहत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अत्यंत धाडसी पद्धतीने साक्ष दिली. स्टॉर्मी हिने ट्रंप आणि तिची पहिली भेट व इतर काय काय घडले याबद्दल सारं काही गुपित उघड केली.
स्टॉर्मीच्या साक्षीनुसार, ट्रम्प यांच्या विरोधात न बोलण्यासाठी तिला खूप मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती. देण्यात आली होती. पण मंगळवारी अमेरिकन कोर्टातील सुनावणी दरम्यान स्टॉर्मी कोर्टात हजर झाली आणि तिने ट्रम्प यांच्याबद्दलची काही 'डर्टी सिक्रेट्स' सांगितली.
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. मात्र ती स्टॉर्मी डॅनियल्स नावाने अधिक लोकप्रिय आहे. स्टॉर्मीने माहिती दिली की, ती 2006 साली ट्रम्प यांना पहिल्यांदा भेटली, जेव्हा ट्रम्प 60 वर्षांचे होते आणि स्टॉर्मी अवघ्या 27 वर्षांची होती.
पहिली भेट कुठे?- माझी ट्रम्प यांच्याशी पहिली भेट 2006 मध्ये लेक टाहो गोल्फ स्पर्धेदरम्यान झाली. ट्रम्प तेथे प्रतिस्पर्धी होते. त्यावेळी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल सांगून त्यांनी मला 'स्मार्ट दिसतेस' असे म्हटले होते.
रात्री डिनरला बोलावले- स्टॉर्मी म्हणाली की, काही वेळाने ट्रम्पचा अंगरक्षक तिच्याकडे आला आणि त्याने तिला ट्रम्पसोबत जेवणाचे निमंत्रण दिले. ट्रम्प यांनी त्यांच्या आलिशान हॉटेल सूटमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. तिने सुरुवातीला नकार दिला पण एका पीआरच्या सांगण्यावरून ती डिनरसाठी गेली.
पत्नीशी संबंध कसे आहेत?- डॅनियल्स पुढे म्हणाले की, जेव्हा ती ट्रम्प यांना भेटली तेव्हा ते सिल्कचा पायजमा घालून समोर आले. गप्पा मारताना त्यांच्या पत्नीबद्दल विचारणा केली असता, आता आम्ही एका खोलीत झोपत नाही इतकं वितुष्ट आहे, असं ट्रम्प यांनी तिला सांगितले.
पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध- संभाषणा दरम्यान स्टॉर्मी बाथरूममध्ये गेली. त्यानंतर ती बाहेर आली तर ट्रम्प त्या खोलीत पोहोचले होते आणि ते टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालून बसले होते. स्टॉर्मी तेथून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होती पण ट्रम्प यांनी तिला रोखले व यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
तुला कुठला आजार नाही ना?- स्टॉर्मी म्हणाली की, ट्रम्प यांनी तिच्याकडून ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीची माहिती घेतली होती. तसेच स्टॉर्मीने लैंगिक संक्रमित रोगांची (Sexually Transmitted Disease) चाचणी केली आहे की नाही हे देखील ट्रम्प यांनी विचारले होते. तुला कुठला शारीरिक किंवा लैंगिक रोग नाही ना? असा ट्रम्पने विचारल्याचे तिने साक्षीत सांगितले.
भेटी वाढत गेल्या- पहिल्या भेटीनंतर हॉटेलमधून बाहेर पडताना ट्रम्प यांनी तिला 'लवकरच पुन्हा भेटू' असे सांगितले. स्टॉर्मी पुढे म्हणाली की, त्या दिवसानंतर दोघे संपर्कात होते. तिने फोन रेकॉर्डही दाखवले, ज्यात ट्रम्पच्या असिस्टंटच्या फोनवरून स्टॉर्मीला अनेक वेळा कॉल करण्यात आले होते. ट्रम्प प्रेमाने स्टॉर्मीला 'हनीबंच' म्हणत असल्याचा दावा स्टॉर्मीने केला.
पैशासाठी नव्हे तर भीतीपोटी सारं काही होऊ दिलं- स्टॉर्मी म्हणाली की, ट्रम्पना विरोध न करणं ही कृती पैशासाठी नव्हे तर भीतीपोटी तिच्याकडून घडली. हॉटेल रुममधून बाहेर पडताना, स्टॉर्मीचे हात थरथरत होते आणि तिला तिचे बूट देखील घालता येत नव्हते. स्टॉर्मीने सांगितले की ट्रम्प यांनी तिला सांगितले होते की ती त्यांना त्यांच्या मुलीची आठवण करून देते, जी खूप हुशार आणि सुंदर आहे, पण तिचे कौतुक केले जात नाही.
सेक्स परस्पर सहमतीने झाला- ट्रम्प स्टॉर्मीने पुढे सांगितले की, ट्रम्प यांच्यासोबत सेक्स करताना हे परस्पर सहमतीने झालं होतं. ट्रम्प यांनी कंडोम घातला नव्हता आणि मी देखील त्यांना रोखले नाही. मी केवळ छताकडे बघत राहिले. यानंतर दोघेही 2007 मध्ये लॉस एंजेल्समध्ये पुन्हा भेटले. या दरम्यान ट्रम्प यांनी तिला पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. पण तेव्हा मात्र अखेर स्टॉर्मीने हिमतीने त्यांना नकार दिला.
स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्पसोबत असलेल्या शारीरिक संबंधांबाबत मौन बाळगावे म्हणून तिला पैसे देऊ केले होते. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत लैंगिक संबंधांबद्दल शांत राहण्यासाठी डॅनियल्सला 1.30 मिलियन डॉलर्स दिल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. मात्र, ट्रम्प यांनी डॅनियल्ससोबत शारीरिक संबंध ठेवलेच नसल्याचा दावा केला आहे. पण 2016 मध्ये ट्रम्प यांच्यासोबत स्टॉर्मीने नाव जोडले गेल्याने ट्रम्प यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला होता.