जगाच्या यादीत भारतातील शहरे किती स्मार्ट? पाहा देशाचे रँकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:30 PM2024-07-08T13:30:28+5:302024-07-08T13:50:59+5:30

नागरिकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट शहरांचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे.

जगभरातील स्मार्ट शहरांचा आढावा घेणाऱ्या 'आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स' नुसार भारतातील शहरांचे रँकिंग यावर्षी काही प्रमाणात सुधारले असले तरीही गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने घसरण होत आहे.

आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स ५०२.५४ नुसार, २०२४ मधील टॉप १० सर्वात स्मार्ट शहरांमध्ये शाश्वत शहरी नियोजन, प्रगत तंत्रज्ञान आणि शहरी जीवनाचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्यात आलंय.

महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेतील एकही शहर या यादीत टॉप टेनमध्ये नाही. तसेच भारतातील एकही शहर टॉप १००मध्येही नाही.

ही आहेत जगातील टॉप ५ स्मार्ट शहरे - इयूरिक, ओस्लो, कॅनबेरा, जिनेव्हा, सिंगापूर

भारतातील शहरांचे रँकिंग पहिल्या १०० मध्ये नसले तरी या यादीत देशाच्या दिल्ली, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.