human trials of corona vaccine begins in russia
'या' देशात कोरोनाची लस तयार, ह्युमन ट्रायलला सुरूवात By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:16 PM2020-06-18T14:16:20+5:302020-06-18T14:40:21+5:30Join usJoin usNext रशियाने कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी तयार केलेल्या वॅक्सीनची क्लीनिकल ह्यूमन ट्रायलसाठी सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या औषधांची ट्रायल घेण्यासाठी आम्ही दोन गट केले आहेत. प्रत्येक गटात 38-38 लोक असणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. रशियाची न्यूज एजन्सी तासच्या माहितीनुसार, मिलिट्रीचे जवान आणि सामान्य नागरिक असे एकत्र करून दोन गट तयार करण्यात आले आहेत. कारण, तयार करण्यात आलेल्या वॅक्सीनची प्रायोगिक चाचणी यशस्वी होऊ शकेल. ही वॅक्सीन गामालेया सायंटिफिक रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. या वॅक्सीनचे ह्युमन ट्रायल दीड महिन्यात पूर्ण होईल, असे या इंस्टिट्यूटचे संचालक अॅलेक्झेंडर जिंट्सबर्ग यांनी सांगितले. लिक्विड आणि पावडर या दोन्ही औषधांची चाचणी मॉस्कोमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी होईल. बर्डेन्को मिलिट्री हॉस्पिटलमध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देऊन द्रव औषधाची चाचणी केली जाईल. ही पावडर इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे स्वयंसेवकांच्या शरीरात दिली जाईल. मॉस्कोच्या सेशेनोव्ह फर्स्ट स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल केली जाईल. या ट्रायलचे फायदे आणि तोटे याबद्दल रशियाने सर्व स्वयंसेवकांना माहिती दिली आहे. त्याच्याबरोबर विमा कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सर्व स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. हेल्थ स्क्रिनिंगमध्ये असे दिसून येत आहे की, एखाद्या रुग्णाला जुनाट आजार, एचआयव्ही, हिपॅटायटीस, कोरोना व्हायरस इत्यादी नाही आहे. जेव्हा सर्व तपासण्या केल्या जातात, तेव्हा स्वयंसेवक योग्य आढळेल, त्यानंतर त्याच्या शरीरात कोरोना व्हायरसच्या नवीन लसीची चाचणी सुरू होईल. पहिल्या स्वयंसेवकांना 18 किंवा 19 जून रोजी लस दिली जाईल. ही लस दिल्यानंतर 28 दिवस स्वयंसेवकांच्या शारिरीक कृतींवर नजर ठेवली जाईल. या दरम्यान, वॅक्सीनच्या परिणामाचा सखोल अभ्यास केला जाईल.टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्याHealthcorona virus