दर दिवशी काढलं जातं शेकडो टन सोनं, हे ठिकाण आहे जगातील खरी ‘KGF’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:04 IST2025-01-07T16:01:12+5:302025-01-07T16:04:40+5:30

Gold Mines: आजच्या काळात जगातील बहुतांश सोनं हे खाणीमध्ये उत्खनन करून बाहेर काढलं जातं. सोनं खाणीतून कशाप्रकारे बाहेर काढलं जातं हे केजीएफ या चित्रपटामधून तुम्ही पाहिलं असेल. पण जगातील सर्वाधिक सोनं कुठल्या खाणीमधून मिळतं, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? हे आपण आता जाणून घेऊयात.

आजच्या काळात जगातील बहुतांश सोनं हे खाणीमध्ये उत्खनन करून बाहेर काढलं जातं. सोनं खाणीतून कशाप्रकारे बाहेर काढलं जातं हे केजीएफ या चित्रपटामधून तुम्ही पाहिलं असेल. पण जगातील सर्वाधिक सोनं कुठल्या खाणीमधून मिळतं, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? हे आपण आता जाणून घेऊयात.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये सोन्याच्या मोठ्या खाणी आहेत. मात्र अमेरिकेतील नेवाडा येथील खाण ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या खाणीमधून अमेरिकेत खाणीमधून काढल्या जाणाऱ्या एकूण सोन्यापैकी ७५ टक्के सोनं या खाणीमधून काढलं जातं. त्यामुळेच नेवाडाला सोन्याच्या खाणीचा गड मानलं जातं.

नेवाडा सोन्याच्या उत्पादनामध्ये अमेरिकेचा प्रमुख स्रोत आहे. येथे १९ व्या शतकाच्या मध्यापासून सोन्याचा शोध सुरू झाला होता. तेव्हापासून येथे खाणकाम हे आर्थिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. या खाणींमधून केवळ केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेला भक्कम हातभारच लागलेला नाही तर अमेरिकेतील सोन्याचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे.

नेवाडामध्ये असलेल्या सोन्याच्या खाणींपैकी एक कार्लिन ट्रेंडचं नाव खासकडून घेतलं जातं. या खाणीला जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यांपैकी एक मानलं जातं. कार्लिन ट्रेंडमध्ये मायक्रोस्कोपिक सोन्याचे कण सापडतात. ज्यांना कार्लिन स्टाइल गोल्ड डिपॉझिट म्हणतात.

समोर आलेल्या माहितीनुसार नेवाडामध्ये कार्लिन ट्रेंडने ७० दशलक्ष औंस (१९ लाख किलो) हून अधिक सोन्याचं उत्पादन केलं आहे. खाणीमधून सोनं काढणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यासाठी वेगवेगळ्या तांत्रिक मशिनींचा उपयोग करावा लागतो.

नेवाडामधील खाणींनी येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. या क्षेत्रामध्ये खाण उद्योगाने हजारो रोजगार निर्माण केले आहेत.