CoronaVirus: खालच्या फ्लॅटमध्ये रुग्ण आहे, तर तुम्हाला कोरोना होऊ शकतो का? जाणून घ्या उत्तरे By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:49 AM 2021-05-11T10:49:14+5:30 2021-05-11T11:07:24+5:30
Can corona Virus infection from Toilet, Drainage pipes in Apartment? : वैज्ञानिकांना गेल्या महिन्यात वाटले होते की, कोरोना व्हायरस हा स्प्रे बॉटलमधून निघणाऱ्या पाण्यासारखा पसरत आहे. काही फूट हवेत पुढे जात आणि नंतर पडतो. मात्र, यंदा वैज्ञानिकांची मते बदलली आहेत. आता त्यांना वाटू लागले आहे की, कोरोना व्हायरस डिओ सारखा वागू लागला आहे. तुम्ही थोडा स्प्रे केला आणि संपूर्ण खोली भरून जाते, तसा. वैज्ञानिकांना गेल्या वर्षी वाटले होते की, कोरोना व्हायरस हा स्प्रे बॉटलमधून निघणाऱ्या पाण्यासारखा पसरत आहे. काही फूट हवेत पुढे जात आणि नंतर पडतो. मात्र, यंदा वैज्ञानिकांची मते बदलली आहेत. आता त्यांना वाटू लागले आहे की, कोरोना व्हायरस डिओ सारखा वागू लागला आहे. तुम्ही थोडा स्प्रे केला आणि संपूर्ण खोली भरून जाते, तसा. (Corona Virus transmission by toilet pipe.)
आताच्या अनुमानानुसार कोरोना व्हायरस हवेत राहतो, हवेच्या गतीने पुढे पुढे जातो, मागे ही येतो. जर एखादा कोरोना रुग्ण वेगळ्या खोलीत राहत असेल तर इलेक्ट्रीक चिमनीद्वारे व्हायरस किचनमध्येही पोहोचतो. पहिली लाट जेवढी विध्वंसक नव्हती तेवढी दुसरी आणि येणारी तिसरी लाट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकाच इमारतीत किंवा घरात परंतू वेगवेगळे राहिले तरीदेखील कोरोना व्हायरस एकापासून दुसऱ्याला पसरण्याचा धोका असतो का? कोरोना व्हायरस खिडक्या ओलांडून, दरवाजातून किंवा एखाद्या कोरोनाबाधिताच्या दरवाजाबाहेरून फेरी मारल्याने कोरोना होतो याचे पुरावे सापडलेले नाहीएत. मात्र, एक असा रस्ता आहे जेथून कोरोना व्हायरस एका रुग्णाकडून शेजाऱ्या-पाजाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. हा रस्ता आहे टॉयलेट.
डायरिया हे लक्षण कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये येते. रुग्णाच्या मलमुत्रामध्ये व्हायरसचा आरएनए किंवा जेनेटिक कोडमध्ये आढळतो. जर व्हायरस रुग्णाच्या मलमुत्रामध्ये जिवंत असेल आणि त्याची संक्रमक क्षमता तेवढीच असेल तर विचार करा...फ्लश केल्यानंतर काय होईल? अमेरिकेच्या द वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख प्रकाशित झाला आहे. हरवर्ड विद्यापिठाच्या टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये एका मोहिमेचे संचालक जोसेफ जी एलन यांनी ही माहिती दिली आहे.
एका फ्लॅटच्या टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेटमध्ये कोरोना व्हायरस पसरू शकतो का? टॉयलेटमध्ये फ्लश करताना प्रति क्युबिक मीटर हवेत 10 लाख कण मिळतात. यापैकी साऱ्यांमध्येच व्हायरस मिसळत नाही. ऑफिस किंवा रेस्टॉरंटमध्ये टॉयलेटनंतर दुसऱ्या वापरणाऱ्यास हा धोका होऊ शकतो. म्हणजेच कोरोना बाधिताने टॉयलेट वापरले त्यानंतर दुसरा कोणी गेला तर त्याला कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते. आता प्रश्न हा उरतो की अपार्टमेंटमधील एका फ्लॅटच्या टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेटमध्ये कोरोना व्हायरस पसरू शकतो का?
हाँगकाँगमध्ये काय घडलेले? एक उदाहरण दिले आहे...अमॉय गार्डन नावाची एक 50 मजली इमारत आहे. 2003 मध्ये जेव्हा सार्स महामारी पसरली होती, तेव्हा या इमारतीतील 342 रहिवासी आजारी पडले होते. त्यातील 42 जणांचा मृत्यू झाला होता. सार्स हा कोरोना व्हायरसच्या परिवारातीलच आहे. सार्स तेव्हा टॉयलेटच्या पाईपमधून इमारतभर पसरला होता.
सार्सचा पहिला रुग्ण ई विंगमध्ये गेला होता. त्याला डायरिया झाल्याने त्याने टॉयलेट वापरले होते. यानंतर ई विंगच्या 99 लोकांना सार्स झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक संक्रमित हे त्या बाधिताच्या वरच्या फ्लॅटमध्ये सापडले होते.
चीनच्या गुआंजूमध्ये काय घडलेले.... काही प्रकरणांत पाईपचे एकापेक्षा जास्त फ्लॅटमध्ये जोडलेले असणे कोरोना व्हायरस प्रसाराचे माध्यम बनले आहे. सायन्स मॅगझिनची लेखिका जॉलीन कैसर यांनी गुआंजूच्या एका घटनेबाबत सांगितले आहे. 15 व्या फ्लोअरवर वुहानहून 5 सदस्य असलेले कुटुंबिया आले होते. ते कोरोनाबाधित होते.
काही दिवसांनी त्या इमारतीतील 25 आणि 27 व्या फ्लोअरवरील दोन कुटुंबे कोरोनाबाधित झाली. तेव्हा चीनमध्ये कठोर लॉकडाऊन होता. त्यामुळे ते बाहेर कुठे गेले नव्हते. चिनी वैज्ञानिकांनी त्या सर्व फ्लॅटच्या पाईपलाईनचा अभ्यास केला आणि हा निष्कर्ष काढला की पाईपद्वारे कोरोना पसरला. यासाठी त्यांनी 15 व्या फ्लोअरवरील एका फ्लॅटच्या टॉयलेट पाईपमध्ये ट्रेस गॅस सोजला आणि तो गॅस 25 व्या आणि 27 व्या फ्लोअरच्या बाथरूममधून निघाला.
काय उपाय करावा लागेल? टॉयलेटमध्ये यु आकाराचा ड्रेनपाईप असतो. त्यामध्ये पाणी साचलेले असल्याने सीवर गॅस बाहेर येत नाही. मात्र, जेव्हा हे पाणी कमी होऊ लागते तेव्हा बाथरूममध्ये वास येऊ लागतो. हाँगकाँगमध्ये 2003 मध्ये असेच झाले होते आणि गॅसमुळे विषाणू वरच्या फ्लॅटमध्ये गेले होते.
जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर कोरोना दूर ठेवण्यासाठी बाथरुमचे सर्व पाईप पाण्य़ाने भरावेत. जर तेथून दुर्गंधी येत असेल तर सावध व्हा. कुठून ना कुठून हवा लीक होतेय.
फ्लश करण्याआधी टॉयलेट झाकावे. जर तुम्ही बाधित असाल तर तुमच्या शेजाऱ्याला कोरोनाची बाधा न होण्यासाठी ही काळजी घ्यावी लागेल.
टॉयलेटमध्ये हवा खेळती राहण्यासाठी जरूर उपाय करावा, त्यामध्ये खिडकी, एक्झॉस्ट फॅन लावलेला असावा.
बाथरुमची जागा नेहमी साफ करत रहावी.