Imam Ahmed, the world's most powerful woman, died in Abu Dhabi
जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 05:49 PM2017-09-25T17:49:12+5:302017-09-25T17:52:52+5:30Join usJoin usNext जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन जगातील सगळ्यात वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणा-या इमान अहमदचं अबुधाबी येथे निधन झालं आहे. पहाटे 4.35 च्या सुमारास इमानने अखेरचा श्वास घेतला.जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन अनेक व्याधींनी ग्रासलेल्या इमानचा हृदयविकार बळावल्यानं आणि मूत्रपिंड निकामी झाल्यानं निधन झाल्याचं बुर्जिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन इमानवर सर्वप्रथम मुंबईच्या चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात डॉ. मुफझ्झल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. इमानच्या बहिणीचे रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर वाद झाल्यानंतर तिला अबूधाबी येथील बुरजील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते. जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन इमानची बहिण शायमाने वैद्यकीय अहवालावर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर, इमानला अबुधाबीला हलवण्यात आलं होतं.जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन इमानला मुंबईत आणले तेव्हा तिचे वजन 500 किलो होते. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात डॉ. मुफझ्झल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने उपचार केले. सर्जरी आणि वेगवेगळ्या थेरपींमुळे तीन महिन्यांत इमानचं वजन ३०० किलोहून अधिक घटलं होतं. जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचं अबुधाबीत निधन मुंबईत येताना ५०४ किलो वजनाची असलेली इमान जाताना १७१ किलोची झाली होती. त्यामुळे कार्गोऐवजी एअरबस -३०० मधून ती अबुधाबीच्या बुर्जिल हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तिथेही तब्बल २० डॉक्टरांचं पथक तिच्यावर विविध उपचार करत होतं. पण, आज पहाटे इमाननं अखेरचा श्वास घेतला.टॅग्स :हॉस्पिटलhospital