मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 06:09 PM2020-07-03T18:09:08+5:302020-07-03T19:05:44+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानकपणे लेहच्या नीमू फॉरवर्ड पोस्टवर पोहोचले. त्यांच्या या सरप्राइज भेटीमुळे पाकिस्तान आणि चीनसह संपूर्ण जग हैराण झाले आहे. नीमू फॉरवर्ड पोस्ट एक असे ठिकाण आहे, जेथून भारत पाकिस्तान आणि चीन दोघांवरही एकाच वेळी निशाणा साधू शकतो. हे ठीकाण रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घेऊया, नेमकी काय आहे या फॉरवर्ड पोस्टची खासियत.

नीमू फॉरवर्ड पोस्ट एक गाव आहे. हे गाव लेहपासून केवळ 35 किलो मीटर अंतरावर लिकिर नावाच्या तालुक्यात वसलं आहे. हे गाव समुद्र सपाटीपासून 11 हजार फूट उंचावर आहे. येथील जास्तीत जास्त तापमाण 40 डिग्री सेल्सिअस तर कमित कमी तापमाण मायनस 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते.

नीमू येथे झाडं-झुडपं अत्यंत कमी आहेत. साधारणपणे येथे चारही बाजुंनी पाहाडांचेच दर्श होते. हिवाळ्यात हा भाग पूर्णपणे बर्फाच्छादित होतो. नीमू गावापासून केवळ 7.5 किलो मीटर अंतरावर मॅग्नेटिक हिल आहे. आपल्या चुंबकीय शक्तीसाठी या पाहाडाची ओळख आहे. हे एक पर्यटनाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

नीमू फॉरवर्ड पोस्टवर मोठ्या प्रमाणावर बौद्ध मठ आहेत. याशिवाय येथे सफरचंदांच्या बागा आहेत. या भागातील सिंधू आणि जंस्कार नदीवर रिव्हर राफ्टिंगसाठीही लोक मोठ्या प्रमाणावर जातात. येथील पत्थर साहिब गुरुद्वारादेखील अत्यंत प्रसिद्ध आहे.

2011च्या जनगणेनुसार, नीमूमध्ये 193 घरं आहेत. येथील साक्षरता दर 72.51 टक्के एवढा आहे. येथील एकूण लोकसंख्या केवळ 1134 एवढी आहे. यापैकी 568 पुरुष तर 566 महिला आहेत.

निमू हा सिंधू आणि जंस्कार खोऱ्यात वसलेला एक मैदानी भाग. 1999मध्ये झालेल्या करगिल युद्धानंतर भारतीय जवानांनी निमूमध्ये आपला बेस तयार केला. हे सैन्य ठिकाण अशा जागेवर आहे. जेथून पाकिस्तान आणि चीन दोन्हीकडेही हल्ला करणे सहज शक्य आणि सोपे आहे.

1980च्या दशकात, भारतीय लष्कराने मेजर जनरल आरके गौर यांच्या नेतृत्वाखाली निमू येथे 28 डिव्हिजन लष्करी तळाची स्थापना केली होती. यानंतर येथील सैनिकांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, कारगिल युद्धानंतर येथे 8वी डिव्हिजन तैनात करण्यात आली.

सध्या, लेह सैन्य मुख्यालयाच्या चौदाव्या कॉर्प्सच्या अंतर्गत येथे दोन सैन्य बेस आहेत. एक लेह येथे, तर दुसरा नीमू येथे आहे. येथूनच भारतीय लष्कर सियाचीनवरही नजर ठेवते.

नीमू एक अत्यंत उत्कृष्ट डिफेन्स लाइन आहे. येथून लडाख, मुस्कोह, द्रास, कारगिल, पाकिस्तान, पेगाँग सरोवर, चुशुल आदी भागांवर थेट लक्ष ठेवता येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये नीमू-बाजगो हाइडल प्रोजेक्टचे उद्घाटन केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी लडाखमधील पारंपरिक वेशभूषेत दिसले होते. यावेळी त्यांच्यासोबत उमर अब्दुल्लादेखील होते.