लाहोर, दि. 2 - नवाझ शरीफ यांच्या विरोधातील राजकीय लढाई जिंकल्याच्या आनंदात असलेल्या इमरान खानला जोरदार धक्का बसला आहे. पक्षातल्याच एका महिला नेत्याने इमरान खानच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. आयेशा गुलालई या महिला नेत्याने इमरान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या इमरानवर राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आरोप झाला असेल. यापूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवत असताना इमरानचे अनेक महिलांसोबत नाव जोडले गेले होते. जेमिमा खान क्रिकेटला अलविदा केल्यानंतर इमरान खानने 1995 साली ब्रिटनमध्ये रहाणा-या जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले. लंडनमध्ये बराच काळ जेमिमा बरोबर घावल्यानंतर 16 मे 1995 रोजी इमरानने जेमिमाबरोबर लग्न केले. पण नऊवर्षातच त्यांचा संसार मोडला. सीत व्हाईट 1987-88 च्या दशकात इमरान खान सीता व्हाईट या अमेरिकन तरुणीसोबत डेट करत होता. जेव्हा सीता त्याच्यापासून गर्भवती राहिली तेव्हा इमरानने अपत्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. अखेर लॉस एंजिल्स कोर्टाने इमरानचा त्या मुलीचा पिता असल्याचा निकाल दिला. झीनत अमान 1980-90 च्या दशकात झीनत अमान बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिच्याशी सुद्धा इमरान खानचे नाव जोडले गेले होते. बेनझीर भुत्तोख्रिस्टोफर सँडफोर्ड यांनी इमरान खानवर बायोग्राफी लिहीली. त्यामध्ये त्यांनी इमरान खानचे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. कारण दोघेही ऑक्सफोर्डमध्ये एकत्र शिकत होते. रेहाम खान इमरान खान यांनी ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही. रेहामन घटस्फोट घेतला आणि पुन्हा मायदेशी परतली.