श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात आंदोलकांचा गोंधळ, धुडगुस, तिथेच तरुणीनं वेगवेगळ्या पोझ देत केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:20 PM2022-07-16T19:20:37+5:302022-07-16T19:24:03+5:30

Sri Lanka Crisis President House: श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनामध्ये आंदोलकांनी धुमाकूळ घातला असताना तिथेच एका तरुणीने वेगवेगळ्या पोझ देत ग्लॅमरस फोटोशूट केल्याचे समोर आले आहे. या फोटोशूटमधील फोटो आता व्हायरल होत आहेत.

श्रीलंका सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात अंदाधुंदी माजली आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. ठिकठिकाणांवरून हिंसक आंदोलनाचे फोटो समोर येत आहेत.

यादरम्यान, श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनामध्ये आंदोलकांनी धुमाकूळ घातला असताना तिथेच एका तरुणीने वेगवेगळ्या पोझ देत ग्लॅमरस फोटोशूट केल्याचे समोर आले आहे. या फोटोशूटमधील फोटो आता व्हायरल होत आहेत.

एकीकडे श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात अनेक आंदोलक धुडगुस घालून स्विमिंग पूल, किचन, बेडरूमपर्यंत घुसून मौजमस्ती करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ही सुंदर तरुणी राष्ट्रपती भवनाच्या आवारात वेगवेगळ्या पोझ देऊन फोटोशूट करत आहे.

फेसबूकवर Maduhansi Hasinthara नावाच्या अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनामध्ये या तरुणीने २६ फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये ती राजभवनाच्या चहुबाजूला उभी राहून फोटो काढताना दिसत आहे. तर कधी सोफ्यावर बसून तर कधी बेडवरून फोटो काढताना दिसत आहे.

एका फोटोमध्ये Maduhansi लॉनमध्ये उभ्या असलेल्या एका लक्झरी कारसमोर उभी राहिलेली दिसत आहे.

१३ जुलै रोजी शेअर करण्यात आलेल्या या फोटोशूटला फेसबूकवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे फोटो हजारो लोकांनी लाईक केले आहे.

दरम्यान, एका युझरने ही तरुणी श्रीलंकेची नवी राष्ट्रपती बनू शकते, अशी गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे.

तर एका युझरने एवढ्या गोंधळात फोटो काढण्याची अशी हौस आधी पाहिली नाही असं म्हटलं आहे.