India China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:21 PM 2020-09-23T19:21:53+5:30 2020-09-23T19:25:58+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील फौजफाटा वाढवला आहे.
सीमावर्ती भागातील तणाव निवळण्यासाठी आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाच्या सहा बैठका झाल्या. मात्र तरीही तणाव कायम आहे.
गेल्या सोमवारीच दोन्ही देशांच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. काही तास चाललेली ही बैठक निष्फळ ठरली.
दोन्ही देशांमधला तणाव वाढला असताना आता चिनी सैनिकांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चिनी सैनिक रडताना दिसत आहेत.
भारताला लागून असलेल्या भागात तैनात करण्यात आल्यानंतर चिनी सैनिकांना रडू कोसळल्याचा दावा करण्यात येत आहे.
चीनमधील सोशल मीडियावर सैनिक रडत असल्याचा व्हिडीओ सर्वप्रथम व्हायरल झाला. त्यानंतर तो डिलीट करण्यात आला.
२० सप्टेंबरला सर्वप्रथम चिनी सैनिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला. तैवानमधील वृत्तवाहिनीनं २२ सप्टेंबरला याबद्दलचं वृत्त दिलं.
चिनी सैन्य बसनं फूयांग रेल्वे स्थानकाकडे जात असताना व्हिडीओ चित्रित करण्यात आल्याचं तैवानच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.
चिनी सैनिकांना सर्वप्रथम हुबेई प्रांतातल्या एका लष्करी तळावर जायचं होतं. त्यानंतर त्यांना भारतीय सीमेजवळ करण्यात येणार होतं.
लष्करी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या या सैनिकांपैकी पाच जणांनी तिबेटमध्ये सेवा दिली आहे.