India will attack Pakistan again on this date, Pakistan claims
'या' तारखेला भारत करणार पाकवर पुन्हा हल्ला, पाकिस्तानचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 06:59 PM2019-04-08T18:59:21+5:302019-04-08T19:02:22+5:30Join usJoin usNext भारतीय लष्कर पुन्हा हल्ला करण्याची भिती पाकिस्तानच्या मनात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानी जनतेला भारतीय लष्कराकडून हल्ला होण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे अशी माहिती दिली. एवढचं नाही तर त्यांनी हल्ला करण्याची तारीख पण जाहीर केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीकडेही आपली चिंता व्यक्त करून दाखवली आहे. पाकिस्तानवर हल्ला होत असताना इतर देशांनी मौन साधलं आहे असा आरोपही त्यांनी केला. 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक केलं, आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन भारताने करुनही देशातील ताकदवान देशांनी भारताला फटकार लगावली नाही असं पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सांगितलं. रॉयटर्सच्या बातमीनुसार भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, येत्या 16 ते 20 एप्रिलमध्ये भारताकडून हा हल्ला करण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. भारत पुन्हा हल्ला करण्याची भिती व्यक्त करतानाच याबाबत कोणताही पुरावा कुरेशी यांच्याकडून दिला गेला नाही. भारतानं पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक केला. तसाच हल्ला पुन्हा केला जाईल असं कुरेशींनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती पंतप्रधान इमरान खान देशाला देण्यास तयार आहेत असं कुरेशी यांनी सांगितले मात्र पाकिस्तानकडून करण्यात आलेला हा दावा भारताकडून फेटाळण्यात आला आहे. टॅग्स :पाकिस्तानभारतपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanIndiapulwama attack