Indian-American attorney Saritha Komatireddy nominated by Trump as US federal court judge rkp
अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश बनणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:15 PM2020-05-06T12:15:33+5:302020-05-06T12:40:27+5:30Join usJoin usNext अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी यांना न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे. न्युयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यातील कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी सरिता कोमातीरेड्डी यांचे हे नॉमिनेशन आहे. गेल्या सोमवारी (दि.४) राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सरिता यांचे नॉमिनेशन US Senate मध्ये पाठविले, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. सरिता कोमातीरेड्डी यांचे कुटुंब भारतीय असले तरी, त्यांचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे. त्यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी घेतली आहे. कोलंबिया सर्किट जिल्ह्याच्या अपील न्यायालयात तत्कालीन न्यायाधीश ब्रेट कॅव्हानोचे कायदा लिपिका म्हणून सरिता कोमातीरेड्डी यांनी काम केले आहे. त्या सध्या अटॉर्नी कार्यालय, न्युयॉर्कमध्ये पुर्व जिल्हा न्यायालयात सामान्य गुन्ह्याच्या उपप्रमुख आहेत. जून 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत त्या आंतरराष्ट्रीय नारकोटिक्स आणि मनी लाँडिंगच्या देखील उपप्रमुख होत्या. त्याआधी 2016 ते 2019 दरम्यान त्यांनी कॉम्प्युटर हॅकिंग आणि बौद्धिक संपत्तीचे समन्वयक म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरिता कोमातीरेड्डी यांचे नाव सिनेटकडे पाठविले आहे. टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पन्यायालयAmericaDonald TrumpCourt