International yoga day 2020: Indo tibetan border police do yoga on 18000 feet ladakh
International yoga day 2020 : १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांची योगासनं, पाहा खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 10:12 AM2020-06-21T10:12:56+5:302020-06-21T10:31:14+5:30Join usJoin usNext आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जूनला संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन योगाचे वेगवेगळे प्रकार करून हा दिवस साजरा केला जात होता. परंतु या वर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरी हा दिवस साजरा करत आहेत. योग दिनानिमित्ताने सीमेवर तैनात असलेल्या जवानांनीही सोशल डिस्टेंन्सिंग राखून योग आणि प्राणायाम केला आहे. शरीर गोठवणाऱ्या थंडीत जवान योग करत असल्याचे काही खास फोटो तुम्ही पाहू शकता. लडाखमध्ये सीमेवर योग दिवस योगासनं करून साजरा केला जात आहे. बर्फात रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी जवान योग आणि प्राणायम करत असल्याचं दिसत आहे. भारतीय जवान १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात या कवायती, योग करत आहेत.टॅग्स :आंतरराष्ट्रीय योग दिनआंतरराष्ट्रीययोगInternational Yoga DayInternationalYoga