शस्रास्त्र, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान सर्वांमध्ये बड्या देशांना भारी, ही ५ सिक्रेट्स बनवतात इस्राइलला सुपरपॉवर By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:15 PM 2023-10-16T15:15:28+5:30 2023-10-16T15:19:30+5:30
Israel-Hamas war: क्रूर हल्ला करून निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या हमासविरोधात इस्राइलनं युद्ध पुकारलं आहे. इस्राइलच्या तुफानी हल्ल्यांमुळे गाझापट्टीमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. इस्राइलचं क्षेत्रफळ हे आपल्या महाराष्ट्रातील दोन तीन जिल्ह्यांच्या आकाराएवढं असलं तरी हा इटुकलासा आकाराने मोठ्या असलेल्या देशांना भारी आहे. इस्राइल ज्या पाच कारणांमुळे सुपरपॉवर बनलाय, ती कारणं आपण आज पाहुयात. क्रूर हल्ला करून निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या हमासविरोधात इस्राइलनं युद्ध पुकारलं आहे. इस्राइलच्या तुफानी हल्ल्यांमुळे गाझापट्टीमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. इस्राइलचं क्षेत्रफळ हे आपल्या महाराष्ट्रातील दोन तीन जिल्ह्यांच्या आकाराएवढं असलं तरी हा इटुकलासा आकाराने मोठ्या असलेल्या देशांना भारी आहे. इस्राइल ज्या पाच कारणांमुळे सुपरपॉवर बनलाय, ती कारणं आपण आज पाहुयात.
पहिलं कारण इस्राइल हा आर्थिकदृष्या भक्कम देश आहे. इस्राइलचा जीडीपी २०२३ मध्ये ५६४ अब्ज डॉलर एवढा होता. तर दरडोई उत्पन्नाचा विचार केल्यास ते सुमारे ५८ हजार डॉलर एवढे आहे. अनेक मोठ्या देशांपेक्षा हा आकडा मोठा आहे. याची तुलना पॅलेस्टाइनबरोबर केली. तर पॅलेस्टाइनचा जीडीपी केवळ १९ अब्ज डॉलरच्या आसपास आहे.
दुसरं कारण स्टॉकहोम इंटरनॅशन पीस रिसर्च इंस्टिट्युटच्या एका अहवालानुसार इस्राइलचं संरक्षण बजेट सुमारे २ लाख कोटी रुपये एवढं म्हणजेच २३.४ बिलियन डॉलर एवढं आहे. हा आकडा इस्राइलच्या एकूण जीडीपीच्या ४.५ टक्के एवढा आहे. तर जागतिक पातळीवर विचार केल्यास जगभरात संरक्षणावर जेवढा खर्च होतो. त्याच्या १ टक्का खर्च इस्राइल करते. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत कमी असला तरी जीडीपीच्या तुलनेत संरक्षणावर खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत इस्राइल जगातील चौथ्या क्रमांकावरचा देश आहे.
तिसरं कारण इस्राइलच्या अर्थव्यवस्थेच्या शक्तीचा विचार केल्यास ती गोष्ट म्हणजे या देशातून होणारी निर्यात आहे. अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन, जर्मनी यासारख्या देशांसोबत इस्राइलचे व्यावसायिक संबंध आहेत. इस्राइलमधून मोती, हीरे-ज्वेलरी, फर्टिलायझर्स आणि क्रूड ऑइल यांची निर्यात होते. भारतासोबतही इस्राइलचे व्यापक आर्थिक संबंध आहेत.
चौथं कारण इस्राइलची संरक्षण यंत्रणा भक्कम आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आयरन डोम (Iron Dome) होय. ही यंत्रणा इस्राइलच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांना हवेतच पाडण्यामध्ये सक्षम आहे. या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेला देशाचं सुरक्षा कवच म्हटलं जातं. आयरन डोमच्या उभारणीसाठी तब्बल ३ लाख कोटी रुपये एवढा खर्च झाला आहे. तर संपूर्ण पॅलेस्टाइन या देशाचा जीडीपी हा जवळपास १.५ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.
पाचवं कारण इस्राइलचं क्षेत्रफळ फार कमी आहे. मात्र लष्करीदृष्ट्या हा देश खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक हल्ल्याला हा देश अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर देतो. आजच्या घडीला इस्राइलची लोकसंख्या ही ९८ लाख एवढी आहे. तर क्षेत्रफळ हे २२ हजार १४५ चौकिमी एवढंच आहे. मात्र इथलं प्रबळ लष्कर आणि तंत्रज्ञान यामुळे कुठलाही देश इस्राइलकडे डोळे वर करण्याची हिंमत करू शकत नाही.