isro eos 06 oceansat captures global false colour composite mosaic map of world
मोठं यश! भारतानं पाठवलेल्या सॅटेलाइटनं तयार केला जगाचा नकाशा, पाहा PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:02 PM2023-03-30T19:02:20+5:302023-03-30T19:07:57+5:30Join usJoin usNext ISRO च्या अर्थ ऑब्जरवेशन सॅटेलाइट-६ (EOS-6)ला ओशनसॅट-३ असंही संबोधलं जातं. या सॅटेलाइटनं आपल्या ओशन कलर मॉनीटर कॅमेरामधून जगाचे फोटो टिपले आहेत. या फोटोंना जोडून जगाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. नकाशा फॉल्स कलर कंपोझिट मोजेक आहे. जे तब्बल २९३९ फोटो एकत्र करुन तयार करण्यात आलं आहे. या फोटोंची प्रोसेस करण्यासाठी इस्रोला ३०० जीबीचा डेटा तपासावा लागला. हे फोटो १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान टिपण्यात आली आहेत. नकाशा दिसणारे रंग हे १३ वेगवेगळ्या वेवलेंथच्या प्रकाश किरणांमुळे आले आहेत. यात संपूर्ण जगाचं जंगल, जमीन आणि समुद्री बायोस्फेयरची माहिती दिसत आहे. या रंगांची माहिती सर्वसामान्य माणसांना कळणं खूप कठीण आहे. त्यासाठीचे काही वैज्ञानिक संकेत आहेत. EOS-6 म्हणजेच ओशनसॅट-३ समुद्री भागात क्लोरोफिल, फाइटोप्लॅंकटॉन, एअरोसोल आणि प्रदुषणाची तपासणी करतो. या सीरिजचा हा तिसरा सॅटेलाइट आहे. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड वन वरुन पीएसएळवी-एक्सएल रॉकेटच्या मदतीनं सोडण्यात आलं होतं. EOS-6 जवळपास १००० किमी वजनी सॅटेलाइट आहे. ओशनसॅट-१ पहिल्यांदा १९९९ रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. यानंतर दुसरं सॅटेलाइट २००९ साली अंतराळात पाठवण्यात आला होता. ओशनसॅट-३ लॉन्च करण्याऐवजी स्कॅटसॅट (SCATSAT-1) अवकाशात पाठवण्यात आला होता. कारण ओशनसॅट-२ निष्क्रीय झाला होता. ओशनसॅटबाबत बोलायचं झालं तर यामाध्यमातून समुद्री सीमेवर लक्ष ठेवता येतं. ओशनसॅट-३ च्या तयारीबाबतीत इस्रोच्या वैज्ञानिकांनी अद्याप कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही. त्यामुळे त्याआधी स्कॅटसॅट लॉन्च करण्यात आलं होतं. स्कॅटसॅटमध्ये असं तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं की जे ओशनसॅटची कमतरचा दूर करू शकतील. PSLV-XL रॉकेट तर 320 टन वजनाचं आहे. याची लांबी ४४.४ मीटर आणि व्यास २.८ मीटर इतका आहे. या रॉकेटमध्ये चार स्टेज असतात. हे रॉकेट अनेक सॅटलाइट्सना वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये लॉन्च करता येतात. टॅग्स :इस्रोisro