Italian alps glacial ice turning pink due to algal blooms
लोणार सरोवरानंतर आता इटलीच्या पहाडांवरील बर्फ झाला गुलाबी, वैज्ञानिक हैराण; सांगितलं असं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 10:52 PM2020-07-06T22:52:33+5:302020-07-06T23:14:23+5:30Join usJoin usNext महाराष्ट्रातील लोणार सरोवरातील पाणी लाल झाल्यानंतर आता इटलीतील एल्प्सच्या पहाडांवरील बर्फाचा रंग गुलाबी (Pink Ice) होत चालला आहे. युरोपातील सर्वात उंच पहाडांवरील बर्फाचा रंग आता पांढरा राहिलेला नाही, तो गुलाबी होत चालला आहे. यापूर्वी मे महिन्यात अंटार्कटिकावरील बर्फ हिरव्या रंगाचा झाला होता. या अचंबित करणाऱ्या प्राकृतिक बदलांमुळे वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. हे बदल दिसायला अत्यंत सुंदर आणि मनमोहक वाटतात. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने हे योग्य नाही. (सर्व फोटोः AFP) इटलीच्या नॅशनल रिसर्च काउंसिलचे बिजियो डी मॉउरो यांनी सांगितले, की ही एक प्रकारची एल्गी (शैवाल) आहे. याला एंकाइलोनेमा नॉर्डेनस्कियोल्डी (Ancylonema Nordenskioeldii) , असेही म्हटले जाते. यामुळेच पानगळ आणि गर्मीच्या दिवसांत, अशा घटना घडतात. मात्र, यांच्यामुळे तयार होणारा डार्क झोन घातक आहे. डार्क झोनमुळे बर्फ वेगाने वितळायला लागतो. असे काही दिवसांपूर्वी ग्रीनलँडमध्येही घडले होते. याशिवाय अंटार्कटिकातील बर्फांवरही एल्गीचा हल्ला झाला होता. यामुळे संपूर्ण बर्फ हिरव्या रंगाचा झाला होता. हा बर्फ जस जसा वितळू लागेल, तस तशी एल्गी सूर्यप्रकाशामुळे आणखी वेगाने पाहाडांवर पसरेल. यामुळे पहाडांचे निरसर्गचक्र बिघडू लागेल. तसेच एल्गीचा फैलाव वाढला तर इटालियन एल्पसचे पाहाड 2100पर्यंत दोन तृतियांश वितळतील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील लोणार सरोवराचे पाणीही लाललो झाले होते. पर्यंटनाच्या दृष्टीने हे नैसर्गिक बदल फार चांगले वाटतात. पण ते पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत. सर्वसाधारणपणे पांढरा बर्फ 80 टक्के सूर्यच्या किरणांना परावर्तीत करतो. मात्र, एल्गीमुळे बर्फ वितळायला लागले, तर या सूर्यच्या किरणांमुळे विविध प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागेल. इटालियन एल्पसमधील पासो गैविया (Passo Gavia) नावाच्या ठिकाणावर सर्वाधिक बर्फ गुलाबी झाला आहे. हे ठिकाण 8,590 फूट उंचावर आहे. पासो गैविया येथे बर्फ वितळायला सुरुवात झाली, तर या पहाडांच्या पायथ्याशी असलेल्या नागरिकांचे मोठे नुकसान होईल. पूर्वी, अंटार्कटिकाचे फोटो पूर्णपणे पांढरे येत होते. आता यात हिरव्या रंग मिसळला गेला आहे. हा हिरवा रंग अंटार्कटिकाच्या तटीय भागांत अधिक प्रमाणावर पाहायला मिळत आहे. असेही होऊ शकते की काही वर्षांनंतर आपल्याला अंटार्कटिकावरील बर्फ हिरव्या रंगाचाच बघायला मिळेल. युरोपियन स्पेस एजन्सीचे सेंटीनल-2 सॅटेलाइट दोन वर्षांपासून अंटार्कटिकाचे फोटो घेत आहे. याचा अभ्यास करून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश अंटार्कटिक सर्वेच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच संपूर्ण अंटार्कटिकामध्ये पसरलेल्या या हिरव्या रंगाचा मॅप तयार केला आहे. वैज्ञानिकांना संपूर्ण अंटार्कटिकामध्ये तब्बल 1679 ठिकाणांवर या हिरव्या रंगाचे बर्फ आढलून आले आहेत. वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की अंटार्कटिकाचा बर्फ हिरवा होण्याचे मुख्य कारण एक समुद्रातील एल्गी आहे. हीच्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणांवर हिरव्या रंगाचा बर्फ दिसत आहे.टॅग्स :इटलीलोणार सरोवरपाणीमहाराष्ट्रItalylonar sarovarWaterMaharashtra