इस्रायलमध्ये जपानी पंतप्रधानांना शूजमधून आईस्क्रीम दिल्यानं वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:34 IST2018-05-10T15:34:08+5:302018-05-10T15:34:08+5:30

जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांना इस्रायलमध्ये बुटांमधून आईस्क्रीम देण्यात आलं. इस्रायलचे अध्यक्ष बिन्यामिन नेतान्याहू यांनी केलेल्या या पाहुणचाराची सध्या जगभरात चर्चा आहे.
शिंझो आबे यांच्यासाठी इस्रायलमधील प्रसिद्ध शेफ सेगेव मोशे यांनी आईस्क्रीम तयार केलं होतं. हे आईस्क्रीम आबे यांना लेदरच्या शूजमधून देण्यात आलं.
शिंझो आबे यांच्या दौऱ्याकडे इस्रायलमधील माध्यमांचं तसं दुर्लक्षच झालं होतं. मात्र या बुटांमुळे आबे आणि नेतान्याहू यांच्या भेटीची चर्चा जगभरात सुरू झाली.
जपानमधील माध्यमांनी या प्रकारावरुन इस्रायलवर टीकेची झोड उठवली. जपानमध्ये चपला घराच्या बाहेर काढल्या जातात. मात्र इस्रायलच्या पंतप्रधानांनी थेट बुटांमधून आबे यांना आईस्क्रीम दिल्यानं जपानी माध्यमांनी टीका केली.
इस्रायलच्या पंतप्रधानांची कृती निषेधार्ह चुकीची असल्याची टीका जपानी माध्यमांनी केलीय.