Kenya's rare white female giraffe 'killed by poachers'
धक्कादायक! जगातील दुर्मीळ जातीच्या पांढऱ्या जिराफांची शिकार By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:19 PM2020-03-12T15:19:20+5:302020-03-12T15:26:06+5:30Join usJoin usNext तुम्ही आतापर्यंत भुऱ्या रंगाचे जिराफ पाहिले असेल. मात्र पांढऱ्या रंगाचे जिराफ क्वचितच पाहिले असणार. अशा दुर्मीळ पांढऱ्या रंगाच्या दोन जिराफांची शिकाऱ्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जगात आता फक्त एकच पांढऱ्या रंगाचे जिराफ असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर-पूर्व केनियाच्या ग्रासिया काउंटी येथे शिकाऱ्यांनी अतिशय दुर्मीळ अशा पांढऱ्या जिराफ मादी आणि तिच्या पिल्लाची शिकार केली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या दोन्ही जिराफांचे मृतदेह आढळले. या प्रजातीचे जगात केवळ तीनच जिराफ होते व आता यातील फक्त एकच शिल्लक आहे. जानकारांच्या मते, हा पांढरा रंग ल्यूसीज्म नानाच्या एका दुर्मिळ परिस्थितीमुळे होते. यामुळे त्यांच्या पेशींमध्ये रंग (पिगमेन्टेशन) येत नाही. या पांढऱ्या जिराफांचे फोटो 2017 मध्ये व्हायरल झाले होते. आफ्रिका वाइल्ड लाइफ फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांत जिराफांच्या संख्येत 40 टक्के घट झाली आहे. मांस आणि चामड्यासाठी जिराफांची हत्या करण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे. 1985 साली जिराफांची संख्या 1 लाख 55 हजार होती. तर, 2015 च्या आकडेवाडीनुसार, ही संख्या आता 97 हजार राहिली आहे. टॅग्स :केनियाप्राण्यांवरील अत्याचारkenyaAnimal Abuse