Kim Jong Un: किम जोंग उन पुन्हा आजारी! वजन घटलेले, शरीर थकलेले...नवे फोटो धक्कादायक By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:58 PM 2021-07-31T13:58:47+5:30 2021-07-31T14:08:47+5:30
Kim Jong Un Health: उत्तर कोरियाच्या जाणकारांनुसार सरकारी टीव्हीवर अशाप्रकारे किम यांच्या प्रकृतीची करणे एक पीआर एक्सरसाईझ आहे. त्य़ांच्याबाबत जगाला सांगून जगभरातून सहानूभूती मिळविण्याचे आणि अशा परिस्थितीतही किम लोकांसाठी काम करत आहेत, असे दाखवायचे आहे. गेल्या वर्षी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या निधनाच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तेव्हापासून किम जोंग उन हे कुठल्याच कार्यक्रमात दिसलेले नाहीत.
. त्यांना कोणतातरी खतरनाक आजार झाल्याचे सांगितले जात आहे. किम यांची बहीणच सारे काही सांभाळत आहे. (Kim Jong Un waigtlost b 20 kg in year after his death roumers. shocking for north korea.)
किम जोंग उन हा त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जाते. छोट्या छोट्या चुकांवरून किम अधिकाऱ्यांना मृत्यूदंडासारखी शिक्षा करतो. हाच किम जोंग उन सध्या आजारी आहे.
किम जोंग उनचा एक फोटो लीक झाला आहे. यामध्ये तो खूपच थकलेला आणि क्षीण वाटत आहे.
किम जोंग उन याचे गेल्या वर्षभरात 20 किलोंनी वजन कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा सैन्य दलातील अधिकाऱ्यांना अभिवादन करतानाचा फोटो समोर आला होता.
पहिला फोटो हा फोटो एवढा विचित्र वाटत होता की त्यांचा ट्रेडमार्क असलेला माओ सूट ढीला वाटू लागला होता. यानंतर त्यांच्या वजन कमी झाल्याचे आणि आजारी असल्याचे वृत्त पसरू लागले.
दुसरा फोटो महत्वाचे म्हणजे एक महिन्याआधीच तेथील सरकारी मीडियाने किमच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली होती. इतरवेळी किम यांच्या आरोग्याची चर्चा होत नाही, तसेच याबाबतची माहिती लपविली जाते. मात्र, आता त्यांच्या घटलेल्या वजनावर चर्चा होऊ लागली आहे व चिंताही व्यक्त होत आहे.
कोरियन पीपल्स आर्मीच्या कमांडरांची आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पहिल्या वर्कशॉपमध्ये किम खूप बारिक झाल्याचे दिसून आले. या आधी ते आजारी असल्याचे सांगितले जात होते. यामुळे त्यांना नेमका कोणता आजार झाला ते बाहेर आलेले नाही.
लोकांमध्ये नैराश्य गेल्या महिन्यात सरकारी KCTV ने एका सामान्य नागरिकाच्या हवाल्याने सांगितले की, किम यांच्या प्रकृतीवरून देशातील लोक चिंतेत आहेत. उत्तर कोरियामध्ये आर्थिक हालत खूप बेकार झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे देश आर्थिक तंगीतून जात आहे. अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे.
पहिल्यांदाच आरोग्यावर चर्चा (तिसरा फोटो) उत्तर कोरियाच्या जाणकारांनुसार सरकारी टीव्हीवर अशाप्रकारे किम यांच्या प्रकृतीची करणे एक पीआर एक्सरसाईझ आहे. त्य़ांच्याबाबत जगाला सांगून जगभरातून सहानूभूती मिळविण्याचे आणि अशा परिस्थितीतही किम लोकांसाठी काम करत आहेत, असे दाखवायचे आहे.
या आधीही अनेकदा किम यांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या. किम काही आठवडे, काही महिने गायब होत होते. या बातम्या आल्या की ते लोकांसमोर येत होते. म्हणजेच फोटो व्हायरल होत होते. परंतू कोणालाच ते कुठे आहेत, याची माहिती नसायची. (KIM Jong-un's dramatic weight loss may be evidence that North Korea's Supreme Leader has health problems, a UK academic has said.)