know about nasa insight which landed on mars
'मंगळ'मय मंगळवार! 48.2 कोटी किमीचं अंतर कापून नासाचं 'इनसाईट' मंगळावर By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:02 PM2018-11-27T15:02:29+5:302018-11-27T15:33:25+5:30Join usJoin usNext नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. या मिशनबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया. नासाच्या या यशस्वी उड्डाणाने इतिहास रचला आहे. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19,800 किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. 6 महिन्यांत 42.2 कोटी किलोमीटरची यात्रा पूर्ण करून हे यान मंगळावर उतरले आहे. पॅराशूट आणि ब्रेकींग इंजिनचा वापर करून या यानाचा वेग कमी करण्यात आला आणि त्याला मंगळावर उतरवण्यात आले. इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. इनसाईट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. टॅग्स :नासामंगळ ग्रहNASAMars