'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:48 PM 2020-05-18T16:48:10+5:30 2020-06-03T08:35:28+5:30
जेव्हा-जेव्हा चक्रीवादळं येतात, तेव्हा-तेव्हा ते भयंकर विनाशाचे दृष्य मागे ठेऊन जात. आज आम्ही अशाच काही भयावह वादळांच्या बाबतीत बोलत आहोत. या वादळांनी विनाशाचे अति भयंकर तांडव केले होते. पाच लाखहून अधिक लोकांचा जीव घेणारे वादळ - बांगलादेशात 1970 साली आलेले वादळ. त्यावेळी बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. येथील किनाऱ्यावरील कुणालाही, अशा प्रकारचे वादळ येत आहे. याची कल्पना नव्हती. या वादळाचा वेग जवळपास 185 किलोमीटर प्रती तास एवढा होता. किनाऱ्याला धडकताच या वादळाने थैमान घालायला सुरुवात केली. बांगलादेशातील 10 जिल्ह्यांना याचा फटका बसला होता. यात तब्बल पाच लाखहून अधिक लोक मारले गेले होते.
जगात 1800 पासून ते 2009पर्यंत अनेक वादळं आली आहेत. या वादळांनी जबरदस्त विनाश तर केलाच पण प्रचंड मोठी जीवितहानीही केली होती.
टायफून आयडा - हे चक्रीवादळ सप्टेंबर 1958मध्ये 185 किलो मीटर प्रति तास वेगाने येऊन जपानच्या किनाऱ्यावर धडकले. यानंतर याचा वेग तब्बल 325 किलो मीटर प्रति तास झाला. हे वादळ एवढे भयंकर होते, की यात अनेक मोठ-मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या. यात जपानमधील तब्बल 1,269 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या या संख्येने जपानमधील लोकांचा थरकाप उडवला होता. एढेच नाही, तर या वादळामुळे जपानचे त्यावेळी पाच कोटी अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले होते.
टायफून हैयान - हे आतापर्यंतचे सर्वात मोठे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मानले जाते. फिलिपाइन्समध्ये याला 'योलांडा' नावाने ओळखले जाते. हे जगातील आतापर्यंचे चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वादळ आहे. या वादळाचा वेग 314 किलो मीटर प्रति तास एवढा होता.
टायफून हैयान चक्रीवादळ 3 नोव्हेंबर 2013 रोजी तयार झाले. आणि 11 नोव्हेंबरला संपले. या चक्रीवादळामुळे फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि दक्षिण चीनच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले होते. या वादळाने 11 हजार 801 लोकांचा बळी घेतला होता. तर 68 कोटींहून अधिक अमेरिकी डॉलर्सचे नुकसना झाले होते. कदाचित एवढे मोठे नुकसान आजवर कोणत्याही वादळामुळे झालेले नाही.
टायफून किट - टायफून किट हे चक्रीवादळ 1966 मध्ये 314 किलो मीटर प्रति तास वेगाने उठले होते. मात्र, योगा-योगाने ते जमिनीवर आले नाही. यामुळे फारशी जीवित आणि वित्तहानी झाली नाही.
टायफून सेलीः सेली 3 सप्टेंबर 1964 रोजी पोनापेजवळ तयार झाले आणि पश्चिमेकडे वळले. चार दिवसांनंतर याचा वेगे 314 किलो मीटर प्रति तास एवढा झाला. 9 सप्टेंबरला ते फिलिपाइन्सला पोहोचले. यानंतर ते 185 किमी प्रति तास वेगाने चीनला पोहोचले. हे वादाळ त्यावेळच्या सर्वात मोठ्या वादळांपैकी एक होते.
टायफून टिप - हे चक्रीवादळ 12 ऑक्टोबर 1979 रोजी जपानला धडकले. याचा वेग 305 किलो मीटर प्रति तास एवढा होता. मॉनसूनमधील डिस्टरबन्समुले हे वादळ 4 ऑक्टोबरला पोहनपेईजवळ तयार झाले. मात्र, 19 ऑक्टोबरला त्याचा वेग मंदावला. यात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच शेती आणि मत्स्य व्यवसायाचे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले होते.
टायफून कोरा - हेवादळ 30 ऑगस्ट 1966 रोजी तयार झाले. 5 सप्टेंबर 1966 रोजी ओकिनावा बेटाजवळ ते धडकले. याचा वेग 280 किलोमीटर प्रति तास एवढा होता. कोरामुळे, इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे नुकसान झाले होते. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. हे वादळ 7 सप्टेंबर 1966 रोजी उत्तर-पूर्व चीन तर 9 सप्टेंबर 1966 रोजी कोरियाला पोहोचले होते.
हरिकेन अँड्रू - 16 ऑगस्त, 1992 रोजी हे वादल तयार व्हायला सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1992 रोजी ते फ्लोरिडा, दक्षिण पश्चिम लुसियाना आणि उत्तर पश्चिम बहमासला धडकले. याचा वेग 280 किलो मीटर प्रति तास एवढा होता. या वादळामुळे 65 लोकांचा जीव गेला. तर एकूण 26.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले होते.