भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल' By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:25 PM 2020-07-20T13:25:00+5:30 2020-07-20T13:39:59+5:30
या 'फ्लाइंग हॉस्पिटल'च्या मदतीने चीन आपल्या जखमी सैनिकांना हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यास सक्षम असेल. लडाखमधील भारतीय लष्कराची जोरदार तयारी आणि गलवान खो-यातल्या प्रतिसादाने चीन पुरता घाबरलेला असून, त्यानं आता तिबेटमध्ये प्रथमच 'फ्लाइंग हॉस्पिटल' तयार केले आहे.
या 'फ्लाइंग हॉस्पिटल'च्या मदतीने चीन आपल्या जखमी सैनिकांना हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यास सक्षम असेल.
चीनला अशी भीती वाटत आहे की, जर भारताशी संघर्ष झाला तर त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासू शकेल. चीनचं हे 'फ्लाइंग हॉस्पिटल' का विशेष आहे हे जाणून घेऊयात....
तिबेटमधील चिनी सैन्याच्या रुग्णालयांची अवस्था बिकट वस्तुतः भारताच्या सीमेवरील या भागात चिनी सैन्याच्या आरोग्याच्या सुविधा फारच निकृष्ट दर्जाच्या असून, त्यांना Y-9 वैद्यकीय विमान तैनात करावे लागले आहे. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी सैन्याचा सराव करताना एक अधिकारी गंभीर जखमी झाला.
जखमी अधिका-याला चांगल्या उपचारासाठी 5200 किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यासाठी Y-9 वैद्यकीय विमानात पाठविण्यात आले. या विमानातून त्या अधिका-याला शिजिंग येथील रुग्णालयात नेण्यात आले.
गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात 20 भारतीय जवानांना वीरगती मिळाली. चीनने आपल्या ठार सैनिकांचा खुलासा केला नाही.
चिनी सैनिकी सूत्रांनी दावा केला आहे की, लडाखमधील संघर्षात चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात मारले गेले आहेत. जवळपास 40 चिनी सैनिक ठार झाल्याची माहिती भारतीय व अमेरिकन सूत्रांनी दिली आहे.
अनेक सुविधांनी सुसज्ज Y-9 फ्लायर हॉस्पिटल चिनी सूत्रांच्या माहितीनुसार, गलवानसारख्या संघर्षानंतरही आरोग्य सुविधा सुधारण्याची गरज आहे, जेणेकरून मृत्यूची संख्या कमीत कमी राखली जाऊ शकेल, असं चिनी सैन्याचं मत आहे.
वाय -9 हे एक उड्डाण करणारे रुग्णालय आहे आणि गंभीर जखमी सैनिकांचे प्राण वाचविण्यात मदत होईल. या व्यतिरिक्त हिमालयीन प्रदेशातील सीमेवरील अनेक रुग्णालये प्रथमोपचार मदतीसाठी हायपर ऑक्सिजन चेंबरसह सुसज्ज आहेत.
चीन या प्रदेशातील सर्व रुग्णालयांचे आधुनिकीकरण करीत आहे. विमान कॉर्डिओग्राम मॉनिटर, श्वसन यंत्र आणि इतर उपकरणांनी सुसज्ज आहे.