चीनच्या जाळ्यात शेजारी देश फसला; कर्जबाजारी झाल्यानं भिकेला लागण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:49 PM2020-09-15T22:49:11+5:302020-09-15T22:59:17+5:30

पाकिस्तान, नेपाळ यांच्या पाठोपाठ आता आणखी एक देश चीनच्या जाळ्यात सापडला आहे. आधी कर्ज द्यायचं आणि मग ते वसूल करताना संपूर्ण देशाला लुबाडायचं, ही चीनचा कावा पुन्हा एकदा यशस्वी ठरताना दिसत आहे.

पाकिस्तानला चीननं कर्जाच्या जाळ्यात अडकवलं. यानंतर आता लाओस देश चीनच्या कचाट्यात सापडला आहे.

चीनकडून अब्जावधी डॉलरचं कर्ज घेऊन त्याची परतफेड करू न शकलेल्या लाओसवर आता पॉवर ग्रीड गमावण्याची वेळ आली आहे.

कर्जाची परतफेड करता येत नसल्यानं आता चीनमधील सरकारी कंपनी लाओसमधील पॉवर ग्रीड ताब्यात घेणार आहे.

कर्ज द्यायचं, समोरच्या देशाला त्यात अडकवायचं आणि समोरच्या देशाला आर्थिक गुलामीत ढकलून त्याच्यावर वर्चस्व प्रस्थापित करायचं ही चीनची योजना आहे.

चीनमधील सरकारी कंपन्यांनी १५० हून अधिक देशांना १.५ ट्रिलियन डॉलर म्हणजेच ११२ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे.

चीन शेजारी देश असलेल्या लाओसमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करत आहे. त्यावर ६ बिलियन डॉलर खर्च होणार आहेत.

२ डिसेंबर २०२१ रोजी लाओसचा राष्ट्रीय दिवस असतो. या दिवशी राजधानी वियनतियानेमधील पहिली हायस्पीड ट्रेन धावेल.

सुरुवातीला चीननं लाओसला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं. मात्र त्यानंतर चीन आणि लाओसचे संबंध खराब होऊ लागले. याचा फायदा घेत चीननं लाओसवर दबाव आणण्यास सुरुवात केली.

सध्याच्या घडीला लाओसकडे असलेली परकीय गंगाजळी १ बिलियन डॉलरच्या खाली गेली आहे. त्यामुळे लाओस लवकरच दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :चीनchina