कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 10:45 AM2020-08-07T10:45:51+5:302020-08-07T11:04:42+5:30

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाने सगळं काही उद्ध्वस्त झालं. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाने सगळं काही उद्ध्वस्त झालं. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये लोकांची वेदना आणि आक्रोश आहे. प्रशासनाकडून अजूनही मलब्याखालील लोकांचा शोध घेतला जात आहे. (Image Credit : indiatimes.com)

एका रिपोर्टनुसार, कमीत कमी १३५ लोकांचा यात जीव गेलाय तर ५ हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. आता लोक एकमेकांची मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. लोक स्वत: रस्त्यावरील कचरा साफ करत आहेत. कुणी जेवण देतंय तर कुणी औषधं देत आहेत. या लोकांनी हे दाखवून दिलंय की, ते या कठिण काळातही एकमेकांच्या सोबत आहोत.