हाताच्या मनगटावरचा छोटा एसी, आता शरीराचं तापमान ठेवणार नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 09:47 PM2019-01-15T21:47:34+5:302019-01-15T21:54:55+5:30

बऱ्याचदा ऑफिसमध्ये जास्त वातानुकूलित (एसी) वातावरण असल्यानं सर्दी होते. त्यावेळी स्वतःच्या शरीराचं तापमान कमी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं.

ऑफिसचा तो सेंट्रलाइज्ड एसी एकट्या व्यक्तीसाठी कमी करता येत नाही. त्यामुळे तो सहन करण्याशिवाय पर्याय नसतो.

आता तुमच्या मनगटावर धारण करणारा छोटा एसी आला आहे. ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःच्या शरीराचं तापमान कमी-जास्त करू शकतो.

अमेरिका आणि कॅनडामध्ये या घडाळ्यासारख्या छोट्या एसीची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. तसेच ग्राहकांचा या छोट्या एसीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या छोट्या एसीची किंमत भारतीय चलनात 21 हजार रुपयांच्या आसपास आहे. या छोट्या एसीच्या माध्यमातून आपण शरीराला कोणत्याही वातावरणाशी अनुकूल करू शकतो.

घडाळ्यासारखा छोटा एसी मनगटावर धारण करणारी व्यक्ती 5 डिग्रीपर्यंत शरीराचं तापमान कमी करू शकते. हा अनोखा बँड एसी अमेरिकेच्या एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे.

Embr Wave या कंपनीच्या माध्यमातून या छोट्या एसीची निर्मिती केली जातेय. या पॉडक्टचं पहिल्यांदा ऑक्टोबर 2017मध्ये लाँचिंग केलं होतं. मार्च 2018पर्यंत या छोट्या एसीचे 3000 पीसची विक्री झाली आहे.