Who is Liz Truss: कोणाला वाटले होते, लिज उद्याची पंतप्रधान होईल! सातवीत असताना साकारलेली भुमिका By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 06:50 PM 2022-09-05T18:50:16+5:30 2022-09-05T18:53:10+5:30
ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान या थॅचर होत्या. यानंतर जेव्हा ब्रेक्झिटचा निर्णय घेण्यात आला तेव्हा देखील ब्रिटनची पंतप्रधान ही महिला होती, थेरेसा मे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिज ट्रस यांची आज निवड झाली. लिज यांनी ऋषी सुनक यांचा 20,927 मतांनी पराभव केला. लिज या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. लिज या गेल्या तीन सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होत्या. पण त्यांनी सातवीत असताना ब्रिटनचा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिले होते. कोणाला वाटले होते, एका नाटकात तत्कालीन पंतप्रधान आणि आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर यांची विडंबनात्मक भूमिका निभावणारी मुलगी देशाची पंतप्रधान बनेल.
ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान या थॅचर होत्या. यानंतर जेव्हा ब्रेक्झिटचा निर्णय घेण्यात आला तेव्हा देखील ब्रिटनची पंतप्रधान ही महिला होती, थेरेसा मे. यानंतर लिझ या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. लिज या 47 वर्षांच्या आहेत. लिज ट्रस यांचे खरे नाव मेरी एलिझाबेथ ट्रस असे आहे.
2010 पासून त्या राजकारणात आहेत. लिज यांनी राजकारणी म्हणून वेगाने लोकप्रियता मिळवली. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि थेरेसा मे यांच्याही त्या आवडत्या होत्या आणि या कारणास्तव दोघांनीही त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची पदे दिली. त्यानंतर जॉन्सन यांनी त्यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती केली. त्यांनी ब्रेक्झिट मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. जॉन्सननी त्यांना युरोपियन युनियनशी वाटाघाटी करण्यासाठी प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.
ट्रस यांचा जन्म 1975 ला ऑक्सफर्ड येथे झाला होता. लिज यांची आई अण्वस्त्रांविरोधात आंदोलने उभारत होती. शाळेत असताना लिज यांनी तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका साकारली होती. वडील गणिताचे प्राध्यापक होते आणि आई परिचारिका होती. थॅचर यांच्याप्रमाणे ट्रस यांना राजकारणात यश संपादन करता आले नव्हते. लिज यांनी एकदा म्हटले होते, की मी मलाच मतदान केलेले नाहीय.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला होता. यामुळे सुनक यांच्यासह जवळपास ५० जणांनी राजीनामा देत बंड पुकारले होते. यात सरकारचे मंत्रीदेखील असल्याने जॉन्सन यांनी अखेर राजीनामा दिला होता. यानंतर नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.